Devendra Fadnavis : आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळं 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामं पूर्ण करावी लागतील. …