नाकात नथ, इरकलचं लुगडं; सभापती बनलेल्या लेकाला पाहण्यास आई विधिमंडळात येते तेव्हा…
सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विविध पक्षाचे आमदार, पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना, मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी घेऊन विधिमंडळात येतात. महाराष्ट्राचं कायदेमंडळ, जिथून राज्याचा कारभार चालतो ते पाहण्याची सर्वांची इच्छा असते महाराष्ट्राच्या विधिमंडळात जाऊन आमदारांची भेट घ्यावी, कामकाज पाहावं असंही अनेकांना वाटतं. मात्र, जेव्हा या विधिमंडळातील विधानपरिषद सभापतीपदी आपला लेक असतो, त्याचं कामकाज पाहण्यासाठी त्यांची आई येते तेव्हा…