Headlines

PAK vs NZ : सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट, पाक-न्यूझीलंड मॅच रद्द झाल्यास कुणाला फटका?

PAK vs NZ : सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट, पाक-न्यूझीलंड मॅच रद्द झाल्यास कुणाला फटका?
PAK vs NZ : सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट, पाक-न्यूझीलंड मॅच रद्द झाल्यास कुणाला फटका?


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी 8 संघांसह क्रिकेट चाहतेही सज्ज झाले आहेत. सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात 2009 साली टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकणारी पाकिस्तान आणि कधीही चॅम्पियन न झालेल्यी न्यूझीलंड आमनेसामने आहेत. हा सामना शनिवारी 21 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा या फेरीतील पहिला सामना जिंकून सेमी फायनलच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे चाहत्यांना हा सामना रद्द होण्याची भीती सतावत आहेत.

कोलंबोत आतापर्यंत अनेक सामने रद्द झाले आहेत. तसेच सेमी फायनलच्या हिशोबाने सुपर 8 फेरीतील प्रत्येक सामना हा करो या मरो असा आहे. त्यामुळे एकही सामना रद्द होणं हे दोन्ही संघांसाठी नुकसानकारक ठरणारं आहे. या निमित्ताने न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होईल? हे आपण जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे वाया गेल्यास दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात येईल. पहिलाच सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना सुपर 8 फेरीतील उर्वरित 2 सामने कोणत्याही स्थितीत जिंकावे लागतील. तसेच सेमी फायनलमध्ये पोहचण्याचा दावा मजबूत करण्यासाठी विजयासह नेट रनरेटही चांगला ठेवावा लागेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यासह सुपर 8 च्या ग्रुपमध्ये इंग्लंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. त्यामुळे एक सामना रद्द होणं दोन्ही संघांसाठी तोट्याचं आणि सेमी फायनलचं समीकरण किचकट करणारं ठरेल. त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हावा, अशी इच्छा दोन्ही संघांची असेल, यात काही शंका नाही.

कोलंबोतील हवमान काय म्हणतंय?

एक्युवेदरनुसार, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान पाऊस होण्याची शक्यता 75 टक्के इतकी आहे. संध्याकाळी 7 वाजता (सामना सुरु होण्याची वेळ) पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पाऊस अधेमधे खोडा घालू शकतो. त्यामुळे चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात आता हवामान विभागाचा अंदाज खरा ठरणार की सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण होणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

साखळी फेरीतील कामगिरी

दरम्यान पाकिस्तान आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी साखळी फेरीतील 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. टीम इंडिया साखळी फेरीत पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *