Headlines

Pakistan Afganistan War : युद्धात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अभिमान F-16 ला धुळीत मिळवलं का? VIDEO

Pakistan Afganistan War : युद्धात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अभिमान F-16 ला धुळीत मिळवलं का? VIDEO
Pakistan Afganistan War : युद्धात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा अभिमान F-16 ला धुळीत मिळवलं का? VIDEO


पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणाव आता युद्धामध्ये बदलला आहे. मागच्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव होता. रविवारी पाकिस्तानने अफगाणिस्तावर एअर स्ट्राईक केला. त्यानंतर काल रात्री अफगाणिस्तान तालिबाननने सीमावर्ती भागात पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले करुन बदला घेतला. या संघर्षात 55 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय. त्यानंतर पाकिस्तानने रात्रीच काबूल आणि कंदहार येथील तालिबानच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. या लढाई दरम्यान एक पाकिस्तानी फायटर जेट F-16 पाडल्याचा दावा करण्यात येतोय. हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेलं विमान आहे. पाकिस्तानला या फायटर जेटवर नको तेवढा अभिमान आहे.

खांद्यावरुन फायर होणाऱ्या रॉकेट लॉन्चरद्वारे हे पाकिस्तानी जेट पाडल्याचा दावा आहे. सोशल मीडियावर पडलेल्या विमानाला आगीच्या ज्वाळांनी वेढल्याचा व्हिडिओ समोर येतोय. तालिबान समर्थक ग्रुप या व्हिडिओवरुन स्वत:ची पोट थोपटून घेतायत. पण लष्करी एक्सपर्ट्सनी थोडी सावधता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानी जेटला इंटरसेप्ट करुन पाडलं असां अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने वृत्त दिलय. हे विमान कुठल्या मॉडेलच आहे त्या बद्दल रिपोर्टमध्ये माहिती नाहीय. तालिबानी प्रवक्ते झबीहुल्लाह मुजाहिद यांनी प्रत्युत्तराची कारवाई पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केल्याचं कबूल केलं. पण कुठलं पाकिस्तानी फायटर जेट पाडलं? त्याबद्दल त्यांनी काही कमेंट केलेली नाही.

हवाई एक्सपर्ट्सनी व्हायरल फुटेजबद्दल काय प्रश्न उपस्थित केलेत?

या विमानाचा सीरीयल नंबर 85510 असल्याचा व्हिडिओमध्ये दिसतोय. पाकिस्तानी एअरफोर्सकडे असलेल्या F-16 किंवा JF-17 ताफ्यातील विमानांशी हा नंबर जुळत नाही.

2020 साली एक प्रशिक्षण विमान कोसळलं, त्याचं हे फुटेज असावं असं एक्सपर्ट्सना वाटतं. विमानाच्या जळत्या ढिगाऱ्याचा जुना व्हिडिओ युद्धकाळात प्रचारासाठी वापरला असावा, असंही एक्सपर्ट्च मत आहे.

कुठल्याही रिपोर्टमध्ये हे कुठल्या मॉडेलचं एअरक्राफ्ट आहे ते म्हटलेलं नाही. एखादं विमान कमी उंचीवरुन उड्डाण करत असेल तर ते पाडता येऊ शकतं. पण F-16 आणि JF-17 सारखे फायटर जेट्स 20 हजार ते 30 हजार फूट उंचीवरुन उड्डाण करतात. खांद्यावरच्या रॉकेट लॉन्चरवरुन इतक्या उंचावरुन उडणारी विमानं पाडणं शक्य नाही असं एक्सपर्ट्स सांगतात..





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *