Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!

Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन,  तब्बल 200 पोलीस तैनात!
Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन,  तब्बल 200 पोलीस तैनात!


नालासोपारा पूर्व परिसरात आज पहाटेपासूनच पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नालासोपारा येथील प्रगतीनगर भागात मोठ्या प्रमाणावर चाळी-चाळीने वसलेला परिसर असून, या ठिकाणी परदेशी, विशेषतः नायजेरियन नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास असल्याची माहिती आहे. याच परिसरातून अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलिसांकडे येत होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलिसांनी आज मोठी कारवाई हाती घेतली.

या कोम्बिंग ऑपरेशनसाठी सुमारे 150 ते 200 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सकाळपासून संपूर्ण परिसर सील करून घराघरांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान जवळपास 100 नायजेरियन नागरिकांना अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *