Headlines

पवार घराण्याची सून तनिष्का कुलकर्णी कोण? युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, कुटुंब पुन्हा एकत्र

पवार घराण्याची सून तनिष्का कुलकर्णी कोण? युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, कुटुंब पुन्हा एकत्र
पवार घराण्याची सून तनिष्का कुलकर्णी कोण? युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न, कुटुंब पुन्हा एकत्र


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra pawar) आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा आज पार पडला. या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते. पवार कुटुंबातील या नव्या पिढीच्या साखरपुड्यामुळे (Marriage) कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मुंबईत पार पडलेल्या या कार्यक्रमात कुटुंबातील प्रमुख सदस्य एकत्र आले होते. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहे. यापूर्वी युगेंद्र यांच्या आत्त्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती इंस्टाग्रामवरुन माहिती दिली होती. त्यानंतर, आज नियोजित कार्यक्रमात मुंबईतील (Mumbai) तनिष्का यांच्या घरी हा साखरपुडा सोहोळा संपन्न झाला.  

विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरुद्ध मैदानात उतरलेले त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार गेल्या वर्षभरापासून राजकारणात सक्रीय झाले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार केला होता. त्यामुळे, ते माध्यमांमध्ये सातत्याने चर्चेत होते. आता पुन्हा एकदा साखरपुड्याच्या निमित्ताने ते चर्चेत आले आहेत. युगेंद्र आणि तनिष्का यांचा आज साखरपुडा संपन्न झाला. मुंबईतील प्रभादेवी येथे कुलकर्णी कुटुंबीयांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि आनंदात हा सोहळा साजरा झाला असून साखरपुड्याचे फोटो आता समोर आले आहेत. युगेंद्र आणि तनिष्का यांनी गळ्यात पुष्पहार घालून भावी आयुष्याची लगीनगाठ बांधली आहे. मात्र, युगेंद्र यांच्या सुविद्य भावी पत्नी तनिष्का कुलकर्णी कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. 

तनिष्का कुलकर्णी कोण?

तनिष्का कुलकर्णी ह्या मूळच्या मुंबईतील असून त्यांचे वडिल नामवंत उद्योगपती आहेत. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ते रहिवाशी आहेत. तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून उच्च शिक्षणासाठी त्यांनी विदेश गाठले होते. लंडनमधील कास बिझनेस स्कुलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तनिष्का यांच्याबाबतीत सध्यातरी अधिकची माहिती सार्वजनिक नाही. 

सुप्रिया सुळेंनी दिली होती माहिती

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत युगेंद्र आणि तनिष्का यांच्या नात्याची माहिती दिली होती. माझा भाचा युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा झाला आहे. दोघांनी आयुष्यभर आनंदी आणि एकत्र रहावं, खूप शुभेच्छा. पवार कुटुंबामध्ये तनिष्काचे स्वागत करताना आनंद होत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचाही साखरपुडा झाला होता. त्यावेळीसुद्धा लाडक्या आत्याबाई म्हणजेच सुप्रिया सुळे यांनीच ही आनंदाची बातमी सर्वांना कळवली होती.

हेही वाचा

युगेंद्र पवार- तनिष्का कुलकर्णींचा साखरपुडा संपन्न, पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं, फॅमिली फोटोसेशन

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *