काशीमिरा मीरा रोडमध्ये कबूतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणे टाकण्यावरून गंभीर घटना घडली आहे. एका महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. महेंद्र पटेल या ज्येष्ठ नागरिकाने कबूतरांना दाणे टाकण्यावर आक्षेप घेतला असता, त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद ऐकून त्यांची मुलगी प्रेमल पटेल इमारतीखाली आली. त्यावेळी सोमेश अग्निहोत्री आणि इतर दोघांनी प्रेमल पटेल यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी काशीमिरा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या प्रेमल पटेल यांच्या आईवडिलांनी या घटनेबद्दल माहिती दिली. “अगर दो सेकंड लेट हो जाती तो मेरा बेटा मर ही जाता था,” असे प्रेमल पटेल यांच्या आईने सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.