Pratap Sarnaik | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय…

Pratap Sarnaik | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय…
Pratap Sarnaik | एसटी महामंडळाचा मोठा निर्णय; डिजिटल कार्डशिवाय…


महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय प्रशासनाने घेतला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यास मान्यता दिली असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. एसटी महामंडळात राबविण्यात येत असलेले NCMC (National Common Mobility Card) डिजिटल कार्ड मोठ्या प्रमाणावर वितरित केले जात असून प्रवाशांना त्याचा फायदा होत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. हा निर्णय डिजिटल क्रांतीकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही अफवांवर विश्वास न ठेवता प्रवाशांनी लवकरात लवकर NCMC डिजिटल कार्ड खरेदी करून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी केले. डिजिटल प्रणालीमुळे प्रवास अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *