Headlines

जनसुरक्षा विधेयक ते दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये, अधिवेशनात 16 विधेयकं मंजूर, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती 

जनसुरक्षा विधेयक ते दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये, अधिवेशनात 16 विधेयकं मंजूर, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती 
जनसुरक्षा विधेयक ते दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये, अधिवेशनात 16 विधेयकं मंजूर, मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती 


Devendra Fadnavis : पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला आहे. अधिवेशनात 16 विधेयकं आम्ही पास केली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. 93 टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. धरणात चांगला साठा आहे. खरिपाचा हंगाम यंदा चांगला असेल. पावसाची कामगिरी दमदार आहे तशीच आमच्या सरकारची देखील दमदार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस आता पडत आहे. 93 टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे. पंचनामे करण्याचे आदेश दिलेत, काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्यांना पैसे वाटप करतोय. धरणात चांगला साठा आहे. खरिपाचा हंगाम यंदा चांगला असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

जनसुरक्षा विधेयक यासंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या

एससीएसटी समाजाच्या आयोगांना वैधानिक दर्जा दिला आहे. जनसुरक्षा विधेयक यासंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. सगळ्या बैठका समितीच्या खेळीमेळीत पार पडल्या. ज्या सुराधणा सुचवल्या त्याच क्षणी त्या स्वीकारल्याचे फडणवीस म्हणाले. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आपण केलं आहे. गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक मंजूर केलं आहे. मकोकात आता नार्कोटिक्स घेण्याचे देखील ठरवले आहे. पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले.

दिव्यांगांसाठी आता अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय 

राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी आता अडीच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. 
तसेच शिक्षकांना देखील अनुदान दिले आहे. तसेच भूषण गवईंचा यांचे देखील सत्कार आपण केला आहे. अनुकंपाची यादी समाप्त करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. संत सावता महाराज समाधी मंदिर विकासासाठी मान्यता देण्यात आली आहे. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यात आली असल्याचे फडणवीस म्हणाले. 

सत्तारुढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी

सत्तारुढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याची पुढची वाटचाल कशी असणार याबाबतही चर्चा झाली. मात्र, हे खरे आहे की, काही गोष्टी अशा घडल्या की, त्या गोष्टीचं आम्हाला देखील दु:ख आहे. अशा गोष्टी घडू नये म्हणून भविष्यात काळजी घेतली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी कोणतेही पुरावे न देता आरोप केला. आरोप करायचे आणि त्यातून बाजूला व्हायचे ही विरोधकांची भूमिका होती असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Government: अनाथ मुला-मुलींसंदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय; शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *