
पुण्यातील लोणीकंद परिसरात एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी करत तिचा छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात वैष्णवीच्या पतीसह सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानंतर, आणखी एका वैष्णवीबाबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.