
पुणे: हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 36 वर्षीय महिलेच्या नवऱ्याला नोकरी लावण्याच्या अमिषाने (Pune Crime News) लोढाने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे. 27 मे रोजी रात्री पुण्यातील बालेवाडी भागातील पुणे – बेंगलोर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये लोढाने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेने पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल
‘हनी ट्रॅप’सह एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काम देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बलात्कारप्रकरणी गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यानंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर 17 जुलैला लोढाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्रफुल्ल लोढा (वय 62, रा. जामनेर, जि. जळगाव) याच्यावर मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलींचे अश्लील छायाचित्र काढून, मुलींना डांबून ठेवून त्यांना धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 3 जुलै रोजी साकीनाका पोलिस ठाण्यात पोस्को, बलात्कार, खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, तर 14 जुलै रोजी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘पोस्को ‘सह बलात्कार आणि हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी लोढा याला 5 जुलै रोजी अटक केली आहे. आता त्याच्यावर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित लोढा याने पीडित महिलेस पतीला नोकरी लावतो, असे सांगून 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील हॉटेलमध्ये बोलावले. पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात शरीरसंबंध ठेवायला दे, असं सांगितलं. त्याला तिने नकार दिला असता तुझीही नोकरी घालवेन, अशी धमकी दिली आणि जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पीडित महिलेने 17 जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
प्रफुल्ल लोढा परिचय
प्रफुल्ल लोढा हा एकेकाळी जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात होता. पण नंतर प्रफुल्ल लोढा यानी त्याच नेत्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यानी वंचितमध्ये पक्षप्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक 2024 मध्ये वंचित कडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसात लोढाकडून माघार घेण्यात आली होती. कथित समाजसेवक आरोग्यदूत म्हणून ओळख असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरुद्ध यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा