Pune Junner | इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका; काय आहे संकट?

Pune Junner |  इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका; काय आहे संकट?
Pune Junner |  इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका; काय आहे संकट?


सध्या सुरू असलेल्या इराण- इस्त्रायल युद्धामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असून त्याचा फटका भारतातील साखर उद्योगालाही बसताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना निर्यातीसाठी दिलेल्या कोट्यानुसार होणारी साखर निर्यात ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून निर्यात होणारी साखर अनेक बंदरांवर अडकून पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. युद्धामुळे समुद्री मार्गावरील वाहतूक आणि व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी भारतातून परदेशात पाठवण्यात आलेला शेतमाल अनेक बंदरांवर आणि समुद्रातील मार्गांवरच थांबला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे सांगितले जात आहे. साखर निर्यात ठप्प राहिल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिस्थिती लवकर सुरळीत होणे आवश्यक असल्याची मागणीही व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *