Headlines

पुणे जमीन घोटाळा प्रकरण! शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, चार आठवड्यांचा अवधी लागणार 

पुणे जमीन घोटाळा प्रकरण! शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, चार आठवड्यांचा अवधी लागणार 
पुणे जमीन घोटाळा प्रकरण! शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, चार आठवड्यांचा अवधी लागणार 



Pune Land Scam Case : पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या कंपनीसाठी पुण्यातील (Pune) मुंढवा येथील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून महिनाभरात या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे जमीन घोटाळ्यातील आरोपी असलेल्या शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. सुनावणी घेण्यास दोन ते चार आठवड्यांचा अवधी लागणार असल्याचं उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीची मुंबई उच्च न्यायालयात धाव

पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समुळं लक्ष केलं जात असल्याचा तेजवानीचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. एफआयआर मीडिया रिपोर्टवर गुन्हा दाखल केला असून मीडियात फरार घोषित करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. दुसऱ्या जमिनीप्रकरणी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला आहे.

पुण्यातील मुंढवा इथल्या जमीन व्यवहाराबद्दल आधी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल मेजवानी आणि रविंद्र तारु या़ंच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पुणे पोलिसांनी देखील यात उडी घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता‌. पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा बोपोडी आणि मुंढवा या दोन जमीन घोटाळ्यांची संबंधित असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, आता या यातील फक्त मुंढव्याच्या प्रकरणात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी होईल, असं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. पुणे पोलीस आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे, गुन्हा दाखल करणारे पोलीसच आता गैरसमजुतीचं कारण पुढे करत असल्याने पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पार्थ पवार जमीन प्रकरण नेमकं काय?

1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवालही या निमित्ताने विरोधकांकडून उपस्थित केला. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला होता. हे प्रकरण माध्यमांमध्ये आल्यानंतर संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे वडिल अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन दिली होती. दरम्यान, या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. मुंढवा भागातील 40 एकर जागा ज्यांना वतन म्हणून देण्यात आली होती त्यांच्या वंशजांकडून शीतल तेजवानीने पॉवर ऑफ एटरनी मिळवली होती आणि त्यानंतर ती जागा पार्थ पवार यांच्या अमेडीया कंपनीला विकण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर ‘त्या’ प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *