
Raj Thackeray: तुम्ही हिंदी भाषा आणण्याचा प्रयत्न केला, तर दुकानचं नाही शाळाही बंद करणार, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करून गुजरात जवळ नेण्याचा डाव सुरु असल्याचा हल्लाबोलही राज ठाकरेंनी केला. काल (18 जुलै) मीरा-रोडमध्ये राज ठाकरेंनी सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
तुमची भाषा आणि तुमची जमीन गेली तर तुम्हाला अर्थ नाही, कोणी विचारणार नाही, तुमची भाषा टिकवणे गरजेचे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मी पंतप्रधान यांना सांगितले होते, मराठीला दर्जा द्या, दर्जा दिला पण पैसे नाही आले, अशी टीका राज ठाकरेंनी केली. हिंदी भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नडला, याबाबत आश्चर्य वाटते, असा निशाणा राज ठाकरेंनी साधला. माझे तर सगळ्या भाषेवर प्रेम आहे, महाराष्ट्रात जेवढे नेते आहेत त्यापेक्षा माझे हिंदी बरे आहे, याचे कारण माझे वडील, माझ्या वहिलांना उत्तम मराठी हिंदी उर्दू येत होते. भाषा कधीच वाईट नसते, पण आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार, लहान मुलांवर तर नाहीच, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी भाषेसंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं.. यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रात यावं त्यांना मुंबईच्या समुद्रात डुबून मारणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय..
तर मुंबई हळूहळू गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंच्या या दाव्यावर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पलटवार केलाय.. मुंबई गुजरातचाच भाग होता असं विधान निशिकांत दुबेंनी केलंय…