Headlines

Raj Thackeray MNS: राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 8 शिलेदार निवडले पण मनसेचा मुंबईतील मेळावा अचानक रद्द, कारण समोर आलं

Raj Thackeray MNS:  राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 8 शिलेदार निवडले पण मनसेचा मुंबईतील मेळावा अचानक रद्द, कारण समोर आलं
Raj Thackeray MNS:  राज ठाकरेंनी BMC निवडणुकीसाठी 8 शिलेदार निवडले पण मनसेचा मुंबईतील मेळावा अचानक रद्द, कारण समोर आलं


Raj Thackeray MNS: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मुंबईत आठ नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विभाग अध्यक्षांचा समावेश आहे. आगामी  पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या (MNS) वॉर्डनिहाय प्रचारात विभागप्रमुखांची भूमिका महत्त्वाची असते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून आठ नव्या विभागप्रमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. काहीवेळापूर्वीच मनसेकडून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

 

यंदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पाश्वर्भूमीवर गुजराती आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य असणाऱ्या पश्चिम उपनगरात विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यामध्ये कांदिवली पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष म्हणून महेश फारकसे, जोगेश्वरी विधानसभा विभाग अध्यक्षपदी दीपक आर्य, दहिसर विधानसभा विभाग अध्यक्षपदी पांडुरंग राणे, बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्षपदी विश्वास मोरे यांची वर्णी लागली आहे. 

राज ठाकरे यांच्याकडून, ‘जे कोणी काम नाही करत त्यांच्या जागी पर्याय सुचवा’, अशा सूचना नव्या केंद्रीय समितीला देण्यात आल्या होत्या. याच मुद्द्यावर केंद्रीय समितीने विभागवार आढावा घेऊन पक्षाची परिस्थिती, काम करणारे पदाधिकारी यांचा आढावा घेऊन अहवाल दाखल केला आहे. या अहवालात जुन्या नियुक्त्या रद्द करत नव्या नियुक्त्यांवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या नवीन विभाग अध्यक्ष नियुक्त्यांची यादी 

 

प्रदीप वाघमारे – कुर्ला विधानसभा विभाग अध्यक्ष 

 

रवींद्र शेलार- अणुशक्ती नगर विधानसभा अध्यक्ष  

 

महेश फरकासे- कांदिवली पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष 

 

दीपक आर्य- जोगेश्वरी विधानसभा विभाग अध्यक्ष 

 

पांडुरंग राणे- दहिसर विधानसभा विभाग अध्यक्ष 

 

विश्वास मोरे- बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष 

 

अनिल पंडित राजभोज- भांडुप विधानसभा विभाग अध्यक्ष 

 

दिनेश पुंडे- मलबार हिल विधानसभा विभाग अध्यक्ष

 

MNS Melava: मनसेचा उद्याचा मेळावा रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात होऊ घातलेला मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. पक्षातील बदल प्रक्रियेमुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. रविवार दि 27 जुलै रोजी 5 वाजता मुंबईत राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, महिला-पुरुष विभाग अध्यक्ष, महिला-पुरुष उपविभाग अध्यक्ष,महिला-पुरुष शाखा अध्यक्ष तसेच मुंबईतीलच सर्व अंगिकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला आहे. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुढील मेळाव्याची तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे मनसेकडून कळवण्यात आले आहे.

आणखी वाचा

मनसे-ठाकरेंच्या युतीवर पुन्हा मोठं भाष्य; राज्यात दोनच समविचारी पक्ष; संजय राऊतांच्या विधानाने उंचावल्या भुवया, नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *