
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 13 वा स्मृतिदिन आहे. या निमित्तानं, राज्यासह देशभरातून आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक मुंबईतील शक्तीस्थळावर (Balasaheb Thackeray Memorial) येत आहेत. अशातच आज शिवसेनाप्रमुखांच्या सृती दिनानिमित्त देशासह राज्यातील राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. तर दुसरीकडे याच निमित्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्याचे बघायला मिळेल आहे. स्मृतीदिनाच्या निमित्याने स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दिसून आले. तब्बल अकरा वर्षांनी या शक्तीस्थळावर ठाकरे बंधू एकत्र आल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंसह मनसेचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
Balasaheb Thackeray Memorial : तब्बल अकरा वर्षांनी ठाकरे बंधू या शक्तीस्थळावर एकत्र
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेनेच्या युतीची जोरदार चर्चा आहे. तर त्याच अनुषंगाने अनेक मुद्यांवर वेळो वेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दिसून येत आहे. अशातच बाळासाहेब ठाकरे यांच्या 13 वा स्मृतिदिनानिमित्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर ती बाळासाहेबांना खरी आदरांजली असेल, अशा संदर्भांत भाष्य केलंय. त्यामुळे आजच्या या भेटीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे. राज्यातील राजकीय समीकरण आणि वातावरण पाहता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत, हीच देशभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांची मनातली इच्छा असल्याचे बोललं जात आहे. अशातच आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने हे दृश्य अनेकांसाठी समाधानकारक आहे.
Sanjay Raut: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी संजय राऊतांकडून अभिवादन
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. तर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून लांब असलेले खासदार संजय राऊत आज मात्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. दुर्धर आजार होऊनही बाळासाहेबांसाठी संजय राऊत अखेर आज घराबाहेर पडलेत. यावेळी तोंडाला मास्क लावून शिवसैनिकांच्या गराड्यात ते स्मृतीस्थळावर पोहोचले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहवलं नाही आणि घोषणा केल्यानंतर 17व्या दिवशी संजय राऊत घराबाहेर पडत स्मृतीस्थळावळ पोहचहलेत.
संबंधित बातमी:
आणखी वाचा