Ramdev Baba: काय आहे पतंजली लोहासव सिरप? कसं करते हे काम, रामदेव बाबांची खास माहिती

Ramdev Baba: काय आहे पतंजली लोहासव सिरप? कसं करते हे काम, रामदेव बाबांची खास माहिती
Ramdev Baba: काय आहे पतंजली लोहासव सिरप? कसं करते हे काम, रामदेव बाबांची खास माहिती


लोहासव सिरपImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क

Ramdev Baba Patanjali Lohasav Syrup: या धकाधकीच्या जीवनात शरीरात रक्ताची कमी असणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. डॉक्टर यासाठी आर्यन, लोहाचे औषध, गोळ्या देतात. पण आयुर्वेदात याविषयी एखादं रामबाण औषध आहे का? याविषयी स्वामी रामदेव बाबा यांनी माहिती दिली आहे. स्वामी रामदेव बाबा यांच्या मते यासाठी पतंजलीचे लोहासव हे एक उत्तम टॉनिक आहे. यामुळे ॲनिमिया म्हणजे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. रक्तसंचार सुधारतो, शरीरात योग्य प्रमाणात रक्त असते.

लोहासव सिरपचे वैशिष्ट्ये काय?

लोहासव सिरप तयार करण्यासाठी भस्माचा वापर करण्यात येतो. आयुर्वेदानुसार, हे औषध आयुर्वेदिक घटाकांपासून तयार करण्यात येते. त्यामुळे शरीराला योग्य घटकांचा मोठा लाभ होतो. यामध्ये आर्यन आणि हिमोग्लोबिन वाढते. या टॉनिकमध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार करण्यात आलेले आहे. याचे कोणतेही इतर दुष्परिणाम नाहीत. पतंजली संशोधन संस्थेच्या सखोल संशोधनानंतर लोहासव सिरप तयार करण्यात आलेले आहे. हे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते. हिमोग्लोबिनची मात्रा वाढवण्यास हे मदत करते. यामुळे शारीरिक कमकुवतपणा, थकवा आणि घेरी येण्याच्या प्रकारात मोठा लाभ मिळतो.

कोणासाठी लोहासव सर्वात फायदेशीर?

लोहासव हे एक आयुर्वेदिक उत्पादन आहे. हे खासकरुन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत करते. ॲनिमिया, ज्येष्ठ नागरिकांमधील थकवा, तर ज्यांचा आहार व्यवस्थित नाही. त्यांच्यासाठी हे औषध फायदेशीर मानले जाते. पाण्याच्या समप्रमाण लोहासव घेता येते. प्रत्येक वयोगटासाठी याची मात्रा वेगवेगळी असू शकते. अर्थात कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा आजारांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेणे योग्य ठरत नाही. त्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.

शरीरात रक्त का होते कमी?

महिलांमध्ये ॲनिमिया हा प्रकार अधिक आढळतो. जेवणाची वेळ न पाळणे, आहार पथ्य न पाळणे या कारणामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होते. ॲनिमियामुळे शरीरात रक्ताची प्रमाण कमी होते. ही पातळी जर खालवली तर मग शरीराला मोठे नुकसान होते. तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्यानुसार तुम्ही औषधं घेऊन शरीरातील रक्ताची पातळी, प्रमाण वाढवू शकता. त्यामुळे इतर आजार बळावत नाहीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *