
आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. आयपीएल स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना काही विक्रम नोंदवले. चला जाणून घेऊयात 10 विक्रमांबाबत
RCB vs SRH: विराट कोहलीचं नाबाद अर्धशतक, पहिल्याच सामन्यात नोंदवले इतके सारे विक्रमImage Credit source: RCB Twitter
आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला 6 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात पूर्णपणे आरसीबीचा वरचष्मा दिसून आला. सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान आरसीबीने 15.4 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 38 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार मारत नाबाद 69 धावा केल्या. यासह विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात एक दोन नाही तर 10 विक्रम नोंदवले. चला जाणून घेऊयात विराट कोहलीने कोणते विक्रम नोंदवले ते…
विराट कोहलीचे 10 विक्रम
- आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने धावांचा पाठलाग कताना 4000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
- आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 7 अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे.
- विराट कोहलीने डेविड वॉर्नरचा विक्रमही मोडला आहे. डेविड वॉर्नर या सामन्यातील खेळापूर्वी सर्वाधिक वेळा टॉप स्कोरर राहिला होता. आता विराट त्याच्या पुढे निघून गेला आहे.
- आयपीएलमध्ये विजयी सामन्यात सर्वाधिक 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. त्याने 42 वेळा अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी डेविड वॉर्नरने 41 वेळा असं केलं आहे.
- धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 21 वेळा 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. त्याने वॉर्नर आणि धवनचा विक्रम मोडीत काढला आहे.
- विराट कोहली आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 182 षटकार मारणार ओपनर ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकलं आहे. त्याने 179 षटकार मारले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत दोघांमध्ये चुरस असणार आहे.
- आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 874 धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने संजू सॅमसनचा विक्रम मोडीत काढला आहे.
- आयपीएल स्पर्धेत 150 हून अधिक स्ट्राईक रेटने सर्वाधिक 31 वेळा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकलं आहे.
- आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या 50पेक्षा जास्त धावा करण्याच्या खेळींची संख्या आता 72 झाली आहे. त्याने 260 व्या डावात ही कामगिरी केली.