Headlines

Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे

Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे
Realme 16 5G मध्ये मिळणार नवा सेल्फी मिरर फिचर, डिझाईन देखील असणार आयफोनसारखे


Upcoming Smartphone in India :  Realme लवकरच ग्राहकांसाठी नवा Realme 16 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. या नव्या स्मार्टफोनच्या लाँच पूर्वी कंपनीने हळूहळू या हँडसेटची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. हे कन्फर्म आहे की या डिव्हाईसच्या बॅक पॅनलवर एक नवीन हार्डवेअर एलिमेंट असणार आहे. ज्यामुळे युजर्स मेन रिअर कॅमेऱ्याच्या मदतीनेही सेल्फी घेऊ शकणार आहे. चला तर या हँडसेटमध्ये कोण-कोणती वैशिष्ट्ये आहेत हे पाहूयात..

Realme 16 5G Specifications (कन्फर्म)

कंपनीने सेल्फी मिरर फिचरची माहिती देत आपल्या अधिकृत अकाऊंटने पोस्ट देखील शेअर केली आहे. या फोनमध्ये ६.५७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.याशिवाय फोनमध्ये ७००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ६० वॅट फास्ट चार्जच्या सपोर्टसह मिळणार आहे.

१८३ ग्रॅम वजन आणि ८.१ mm जाडीच्या या फोनमध्ये कॅमेरा बार, सेल्फी मिरर फिचर, ४२०० निट्स पीक ब्रायटनेस, ३००० हर्ट्ज टच सँपलिंग रेटसह मिळणार आहे. कंपनीने लाँच तारखेची घोषणा केलेली नाही. या फोनचे डिझाईन iPhone Air आणि Google Pixel 10 ने प्रेरित वाटत आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ६४०० टर्बो प्रोसेसर, सोबत १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळणार आहे.

बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि कॅमरा डिटेल्स

जर हा डीव्हाईस व्हिएतनाममध्ये लाँच झालेल्या Realme 16 5G सारखा असेल तर Realme 16 5G च्या इंडीयन व्हेरिएंटमध्ये 60W चार्जिंग स्पीडसह ७००० mAh दमदार बॅटरी असू शकते. या फोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात ५० मेगा पिक्सेलचा वाईड एंगल सेंसर आणि २ मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा असेल.
आतापर्यंत किंमत, स्पेक्स वा योग्य उपलब्धतेच्या संदर्भात कोणतीही माहिती आलेली नाही. मात्र, याची लाँचिंगची तारीख जवळ येईल तसतसे त्याची आणखी माहिती देखील समोर येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *