
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली (Delhi) भीषण स्फोटाने हादरल्याने मुंबईसह प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाल किल्ल्याजवळ(Red fort) झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 14 जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटात अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या असून स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या शरिरीचे अवयवही रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. त्यावरुन, या स्फोटाची दाहकता लक्षात घेता येईल. दरम्यान, अद्याप या स्फोटाचं (Blast) कारण समजलं नसले तरी मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे.
जेव्हा आवाज आला, धमाका झाला तेव्हा मी माझ्या दुकानावर बसलो होतो, इथं पाठीमागे माझं दुकान आहे. अचानक एवढा मोठा धमाका झाला की, मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही. धमाक्याच्या हादऱ्यामुळे मी तीनवेळा खाली पडलो, असा थरारक अनुभव दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर प्रत्यक्षदर्शीने सांगितला. मी दुकान सोडून पळू लागलो, माझ्यासह अनेकजण धावत-पळत होते, असेही त्या दुकानदाराने माध्यमांशी बोलताना सांगितले. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की, मृत्यूला आम्ही जवळून पाहिलंय, आता आपण मरतो की काय असं वाटत होतं. त्यामुळे, मी लांब पळून गेलो, आणि तिथं दोन जणांनी मला धीर दिला, मी कोल्ड्रिंक्स प्यायलो, असा अंगावर काटा आणणारा थरार प्रत्यक्षदर्शीने सांगितला.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आणखी एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेची आप बिती सांगितली, यावेळी त्याला गहिवरुन आलं होतं. माझ्या डोळ्यासमोरच हा स्फोट झाला, आम्ही दूरुनच ते पाहिलं तिथं गेलो नाही. कारण, इथं रस्त्यावरच स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांचे हात आणि शरिराची अवयव छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचं पाहायला मिळालं. कुणी विचारही करू शकत नाही की एकदम हे काय झालंय, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. तर, मी माझ्या घराच्या छतावरुन स्फोट आणि धुराचे लोट पाहिले, त्यानंतर खाली आलो. आमच्या इमारतीलाही हादरा बसला, असेही जवळच राहणाऱ्या राजधर पांडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमित शाहांना फोन (Narendra modi call amit shah)
दरम्यान, या हल्ल्यानंतर प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत घटनेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तर, गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्तांशी फोनवरुन बोलणं केलं असून घटनेचा तपास सुरू आहे.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort | “When we saw someone’s hand on the road, we were absolutely shocked. I can’t explain it in words…” said a local to ANI pic.twitter.com/vmibMbPFUk
— ANI (@ANI) November 10, 2025
हेही वाचा
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
आणखी वाचा