Retirement : भारत-न्यूझीलंड फायनलआधी स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, टीमला झटका

Retirement : भारत-न्यूझीलंड फायनलआधी स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, टीमला झटका
Retirement : भारत-न्यूझीलंड फायनलआधी स्टार खेळाडूचा क्रिकेटला अलविदा, टीमला झटका


साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष हे रविवारी 8 मार्च रोजी होणाऱ्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या पर्वातील महाअंतिम सामन्याकडे आहे. या फायनलमध्ये यजमान भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या असलेल्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. न्यूझीलंडचा हा सामना जिंकून पहिलीवहिली टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर भारत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ चॅम्पियन ठरणार याची क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता आहे. तर दुसऱ्या बाजूला या फायनलआधी एका स्टार क्रिकेटरने अचानक निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.

न्यूझीलंडच्या अनुभवी महिला क्रिकेटपटूने 15 वर्षांच्या कारकीर्दीला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे. मात्र ही खेळाडू टी 20i क्रिकेट खेळत राहणार आहे.

ली टाहुहू हीचा वनडे क्रिकेटला अलविदा

न्यूझीलंडची वेगवान आणि अनुभवी गोलंदाज ली टाहुहू हीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

ली टाहुहू हीने 2011 साली वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी एकदिवसीय पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत ली टाहुहू हीने न्यूझीलंडसाठी अनेक सामन्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच ली टाहुहू हीने न्यूझीलंडला अनेकदा एकहाती सामने जिंकून देण्यात योगदान दिलं होतं.

ली टाहुहूची एकदिवसीय कारकीर्द

ली टाहुहू हीने न्यूझीलंडचं 103 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. ली टाहुहू हीने या दरम्यान 125 विकेट्स मिळवल्या. ली टाहुहू न्यूझीलंडसाठी 100 पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळणारी 12 वी खेळाडू आहे.

कॅन्सरवर यशस्वी मात करुन कमबॅक

ली टाहुहूसाठी क्रिकेटमधील गेली काही वर्ष प्रचंड संघर्षाची राहिली. त्या संघर्षाचं कारण म्हणजे तिला झालेला कॅन्सर. अनेक जण फक्त कॅन्सरचं नाव ऐकूनच खचून जातात. मात्र क्रिकेटर असल्याने आधीपासूनच लढाऊ वृत्ती. त्यामुळे लीने कॅन्सवर मात केली. लीने 2021 साली कॅन्सवर मात करत यशस्वी कमबॅक केलं होतं.

वनडे क्रिकेटला अलविदा

ली टाहुहू हीच्या पायावर एक छोटा तीळ होता. हा तीळ हळुहळु वाढत गेला आणि त्याचा रंग बदलत गेला. डॉक्टरांनी हा तीळ हटवण्याचा सल्ला दिला. मात्र ली टाहुहू हीला दुसऱ्या शस्त्रक्रियेआधी तिला त्वचेचा कॅन्सर असल्याचं निदान झालं. मात्र योग्य वेळी उपचार करण्यात आले. उपचारानंतर ली टाहुहू हीला 8 आठवडे विश्रांती करावी लागली. त्यानंतर ली टाहुहू हीने जोरदार कमबॅक केलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *