
मुंबई : केंद्र सरकारकडून स्वायत्त संस्थांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यातच, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या (Highcourt) न्यायाधीशपदी भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या आणि ज्येष्ठ वकील आरती साठे यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत अनेक सवाल उपस्थित केले होते. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही आरती साठे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. आता, याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजिमयने 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात 3 नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये, भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांचेही नाव आल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीच होईल, न्याय व्यवस्थेच्या निपक्ष:पणावर दूरगामी परिणाम होईल, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. आता, अजित पवार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली.
काय म्हणाले अजित पवार
या संदर्भामध्ये न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेचे काम करत असते. काय निर्णय घ्यायचा यात केंद्र किंवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो. याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मात्र, हा पूर्ण न्यायालयाचा अधिकार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.
यापूर्वीही अनेकजण न्यायाधीश
रोहित पवारांनी स्वाती साठे यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतले आहेत. परंतु, रोहित पवार त्यांना थांबवू शकणार नाहीत. शरद पवार हे रोहित पवारला सुनावणार आहेत की नाही? महाराष्ट्र याची वाट पाहत आहे. याआधी देखील न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्णा अय्यर हे राजकीय पक्षाशी संबंधित होते. सुप्रीम कोर्टात जज होते कम्युनिष्ट सरकार केरळमधे ते मंत्री होते. जस्टिस पी. बी. सावंत हे डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित होते. जीफ जस्टीट रामन्ना हे आणीबाणी काळात चळवळीत सहभागी झाले होते, अशी माहिती अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. तसेच, लोकसेवकाने जबाबदारीने बोलायला हवं, परंतु ते तसं करत नाहीत. ते केवळ वाचाळवीर आहेत, माध्यमांसमोर जाऊन बोलतात. रोहित पवार यांनी लक्षात घ्यावं, त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहण्याची गरज आहे, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.
हेही वाचा
उत्तराखंडमधील ढगफुटी; सोलापुरातील चौघांसह महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित; हेल्पलाईन नंबर जारी
आणखी वाचा