Rohit Pawar Tweet | अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत…

Rohit Pawar Tweet | अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत…
Rohit Pawar Tweet | अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत…


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्विट करत चौकशी प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. रोहित पवार यांनी विचारले की, मिसिंग रेकॉर्डची हेराफेरी VSR ला करता यावी म्हणून चौकशी जाणूनबुजून लांबवली जात आहे का? त्यांच्या मते, संबंधित विमानाच्या एकूण 5 हजार तासांच्या उड्डाण नोंदींपैकी केवळ 1800 ते 2000 तासांचा रेकॉर्ड VSR कडे उपलब्ध असून उर्वरित सुमारे 3 हजार तासांचा रेकॉर्ड उपलब्ध नाही. तसेच, “लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल, तर याचा अर्थ काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी पुढे म्हटले की, दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल, तर याची माहिती DGCA ने CID ला देणे आवश्यक नव्हते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात अधिक गांभीर्य दाखवावे, अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *