Headlines

Russian Oil Price : संधीचा फायदा घेत भारताला लुटून दरदिवशी रशिया तेल विक्रीतून किती कोटी डॉलरचा फायदा कमावतोय?

Russian Oil Price : संधीचा फायदा घेत भारताला लुटून दरदिवशी रशिया तेल विक्रीतून किती कोटी डॉलरचा फायदा कमावतोय?
Russian Oil Price : संधीचा फायदा घेत भारताला लुटून दरदिवशी रशिया तेल विक्रीतून किती कोटी डॉलरचा फायदा कमावतोय?


युद्ध म्हणजे बेचिराख झालेली शहरं, युद्ध म्हणजे जमीनदोस्त झालेल्या इमारती, युद्ध म्हणजे कोसळलेल्या वास्तूचा ढिगारा, युद्ध म्हणजे मृतदेहांचा खच, युद्ध म्हणजे रक्तपात, युद्ध म्हणजे डोळ्यांना त्रास देणारं चित्र. हीच युद्धाची व्याख्या आहे. पण काहींसाठी युद्ध म्हणजे भरभराट, पैसा कमावण्याची चालून आलेली संधी असते. युद्धात माणसं मरतात. पण त्याचवेळी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या भरपूर पैसा बनवतात. काही देश अन्य मार्गांनी पैसा बनवतात. रशिया आज तेच करतोय. इराण, इस्रायल आणि अमेरिका या तीन देशांमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. तिन्ही देशांचं यामध्ये नुकसान होतय. माणसं मरतायत. पाण्यासारखा पैसा खर्च होतोय. ज्या उद्देशाने हे युद्ध चालू केलेलं. तो हेतू अजूनपर्यंत तरी सफल झालेला नाही.

म्हणजे तीन देशांमध्ये सुरु असलेल्या या युद्धात अजून एकही विजेता नाहीय. पण या युद्धापासून लांब असलेल्या रशियाला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. रशिया या युद्धातून भरभरुन पैसा कमवत आहे. काही दिवसांपूर्वी याच रशियाचं तेल विकलं जात नव्हतं. त्यांना कोणी खरेदीदार मिळत नव्हता. कारण अमेरिकेने त्यांच्या तेलावर निर्बंध घातले होते. रशियन तेल खरेदी करायची नाही, या अटीवर भारतासोबत व्यापार करार केला होता. पण नियती खूप अजब असते. आज त्याच अमेरिकेवर रशियन तेलावरील निर्बंध उठवण्याची वेळ आलीय. भारतासह अनेक देशांना ते रशियाकडून तेल विकत घ्या असं सांगत फिरत आहेत.

दरदिवशी रशिया किती कोटी डॉलर कमावतोय?

याचं कारण आहे इराणने त्यांच्याविरुद्ध अमेरिका-इस्रायलने युद्ध पुकारल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा समुद्री मार्ग बंद केला. याच मार्गावरुन जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक होते. त्यामुळे जगासमोर तेल आणि एलपीजी गॅसचं संकट निर्माण झालं. परिणामी बाजारात रशियन तेलाची मागणी वाढली. रशियाने याच स्थितीचा फायदा उचलत बाजारभावाने तेलाची विक्री सुरु केली.

अगदी दोन महिन्यापूर्वी रशिया भारताने मोठी सवलत देऊन तेल विकत होता. पण तोच रशिया आता बाजारभावाने तेलाची विक्री करत आहे. कठीण काळात भारताने आपल्या अर्थव्यवस्थेला मदतीचा हात दिला हे देखील रशिया लगेच विसरला. संधी मिळताच रशियाने चढ्या दराने तेलाची विक्री सुरु केली. रशिया हे तेल विकून दरदिवशी अतिरिक्त 15 कोटी डॉलरची कमाई करतोय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *