
भारताने रशियन तेल खरेदी बंद केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार करार शक्य झाला, असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. पण भारताचा निर्णय मात्र, बिलकुल ट्रम्प यांच्या दाव्याच्या उलट आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केलेली नाही. भारतीय रिफायनरीज अजूनही रशियन तेलाची खरेदी करत आहेत. पण रशियन तेल खरेदीचं प्रमाण मात्र कमी केलं आहे. त्यामुळे रशियाला आपलं उर्वरित तेल विकण्यासाठी अन्य आशियाई देशांमध्ये बाजारपेठ शोधावी लागणार आहे.
भारताने रशियाकडून सवलतीच्या दरातील तेल खरेदी बंद केली आहे. त्यामुळे रशियावर आपलं तेल विकण्याचा दबाव आहे. रशिया आपल्या तेलासाठी अन्य आशियाई बाजारपेठ शोधत आहे. रशियाचे जवळपास एक डझन तेल टँकर समुद्रात आहेत. रशियाला त्यासाठी कोणी खरेदीदार मिळत नाहीय असं ब्लूमबर्गने शुक्रवारी वृत्त दिलं.
किती टँकर फिरतायत?
कमीत कमी 12 तेल टँकर हिंद महासागर, मलेशिया, चीन आणि पूर्व रशियाच्या किनाऱ्यावरुन मार्गस्थ होत आहेत असं ग्लोबल शिपिंग-इंटेलिजेंस फर्म केपलरच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या टँकर्समध्ये जवळपास 1.2 कोटी बॅरल रशियाचं प्रमुख कच्च तेल ग्रेड यूराल्स आहे.
भारताकडून दिवसाला किती लाख बॅरलची तेल खरेदी सुरु होती?
2022 मध्ये युक्रेनसोबत युद्ध सुरु झाल्यानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी कठोर प्रतिबंध लादले. रशियन तेल प्रतिबंधाच्या कक्षेत आलं आणि जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती खूप वाढल्या. या प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर रशियाने भारत, चीन सारख्या आपल्या आशियाई सहकाऱ्यांना सवलतीच्या दरात कच्च तेल ऑफर केलं. त्यानंतर भारताकडून रशियन कच्चा तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु झाली.
ब्लूमबर्गनुसार, जानेवारी महिन्यात भारतात रशियन तेलाची आयात दिवसाला जवळपास सरासरी 12 लाख बॅरल प्रतिदिन होती. 2024 च्या मध्यावर भारत रशियाकडून एकादिवसात 20 लाख बॅरल तेल विकत घेत होता.
भारत अतिरिक्त तेल कुठून विकत घेणार?
समुद्रात इथे-तिथ भरकटत असलेल्या रशियन तेल टँकर्समुळे प्रश्न निर्माण झालाय की, रशिया आपल्या अतिरिक्त यूराल ग्रेड तेलाचं काय करणार?. चीनच्या रिफायनरीजने जानेवारी महिन्यात यूराल्सची खरेदी वाढवून जवळपास 5 लाख बॅरल प्रतिदिन केली. हा आतापर्यंतचा एक रेकॉर्ड आहे. या रिफायनरी सामान्यत: हल्के ग्रेड जसे की, ESPO आणि सोकोलला प्राधान्य देतात. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या सोमवारी टॅरिफ करारानुसार भारत रशियन तेलाची खरेदी बंद करेल असा दावा केला होता.
“भारताने रशियन तेल खरेदी बंदी करुन अमेरिका आणि वेनेजुएलाकडून जास्त तेल खरेदीवर सहमती दर्शवलीय. यामुळे युक्रेन युद्ध संपवायला मदत होईल” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल प्लेटफॉर्मवर म्हटलं होतं.