Headlines

Sachin Ahir | राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?, अंतिम निर्णय उद्धव–आदित्य ठाकरे यांच्याकडे

राज्यसभेतील रिक्त जागेबाबत राजकीय चर्चेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सचिन आहिर यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी आणि महायुतीतील स्थितीबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी सांगितले की, “महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही उमेदवार अंतिम स्तरावर ठरले आहेत का, ही चर्चा सुरू आहे. आम्ही आमची भूमिका मांडत आहोत, बाजू मांडत आहोत, तर ते देखील त्यांची बाजू मांडू शकतील आगामी राज्यसभेच्या निवडणुकीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, पूर्वी पवार साहेबांनी लढावं, अशी चर्चा होती, पण कालपासून पवार साहेब स्वतः लढणार आहेत, असं दिसत आहे. “राष्ट्रवादीचे नेते आमच्या नेत्यांबरोबर बैठकीत बसतील आणि ही चर्चा नेत्यांच्या स्तरावर ठरवली जाईल. त्यामुळे ती सीट सोडायची की लढवायची याचा निर्णय होईल,” असे आहिर म्हणाले. त्यांनी यावरही भर दिला की, “कोणीही कोणतीही सीट लढवली तरी एकमेकांची मदत लागल्याशिवाय होणार नाही. आमच्याकडे बहुमत असल्याने आम्ही आमची भूमिका ठरवतो; संख्याबळावर आमची भूमिका आहे.” असं देखील सचिन आहिर म्हणाले. शेवटी सचिन आहिर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला की, पवार साहेबांचे नाव आल्यानंतर अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात होईल.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *