Saif Ali Khan: मुलांचा इस्लाम धर्म..; अमृताशी घटस्फोटानंतर सैफला सतावली ‘या’ गोष्टीची चिंता

Saif Ali Khan: मुलांचा इस्लाम धर्म..; अमृताशी घटस्फोटानंतर सैफला सतावली ‘या’ गोष्टीची चिंता
Saif Ali Khan: मुलांचा इस्लाम धर्म..; अमृताशी घटस्फोटानंतर सैफला सतावली ‘या’ गोष्टीची चिंता


Amrita Singh: अभिनेता सैफ अली खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. अभिनेत्री करीना कपूर आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेत्री अमृता सिंग हिला घटस्फोट दिल्यानंतर सैफ याने करीना हिच्यासोबत दुसरा संसार थटला. पण घटस्फोटानंतर सैफ अली खान याला एक भीती सतत सतावत होती. अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट होत असतात सैफ प्रचंड तणावाखाली होता. अभिनेत्याच्या मनात एकच भीती होती आणि ती म्हणजे, मुलं त्यांच्या मुळांपासून, इस्लामपासून दूर जाऊ नये…. सांगायचं झालं तर, सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सारा अली खान आहे तर, मुलाचं नाव इब्राहिम अली खान असं आहे.

सांगायचं झालं तर, अमृता सिंग हिला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खान याला मुलांना भेटण्याची परवानगी नव्हती… हे सत्य खुद्द अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 2005 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं होतं. अभिनेत्याला भीती होती ती, मुलं त्याच्या विरोधात गेली तर… त्यांना त्यांच्या खऱ्या ओळखीपासून दूर केलं तर..

सैफ अली खान म्हणालेला, मुलांवर अमृता आणि तिच्या कुटुंबियांचा अधिक प्रभाव बोता. याच कराणामुळे, मला असं वाटायचं की, सारा आणि इब्राहिम पतौडी कुटुंब… नवाबी शिष्टाचार… आणि इस्लामी परंपरेबद्दल कधीच कदाचित काही जाणूच शकणार नाहीत… माझी अशी इच्छा कधीच नव्हती की, सारा आणि इब्राहिम यांनी फक्ता इस्लाम धर्माबद्दल माहिती घ्यावी… मला असं वाटतं मुलांनी सर्व गोष्टी शिकायला हव्यात आणि त्यांच्या सन्मान करायला हवा…’ असं देखील अभिनेता म्हणाला होत.

पण आजची परिस्थिती पाहिली तर, सारा आणि इब्राहिम दोघे धर्मनिरपेक्ष विचारधारेचे आहेत… सारा कायम मंदिर आणि दर्गात जात असते…. सैफ देखील कायम म्हणतो, ‘मुलांच्या संस्काराचं संपूर्ण श्रेय मी फक्त आणि फक्त अमृता हिला देतो…’, सारा आणि इब्राहिम कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

सैफ अली खान याच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, सारा आणि इब्राहिम सावत्र मुलं असली तरी, त्यांचं करीना हिच्यासोबत चांगले संबंध आहेत…  अनेक सण देखील ते एकत्र साजरे करतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *