समान_काम_समान_वेतन चा निर्णय आता अंतिम टप्प्यात

समान_काम_समान_वेतन चा निर्णय आता अंतिम टप्प्यात !
              आमदार शशिकांत शिंदे आणि कामगार एकजुटीमुळे उद्या दिनांक १७.०३.२०२२ रोजी नवी मुंबई महानगर पालिकेचे मा. आयुक्त श्री अभिजीत यांनी यांनी समान काम समान वेतन लागू करणे संदर्भात आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याबाबत पत्र दिले आहे..
            आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी , कामगारांना समान काम समान वेतन मिळावे म्हणून पालिका आयुक्त व *राज्याचे नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे* यांच्याकडे पाठपुरावा करून, हा कामगारांसाठीचा हा लढा चालू ठेवला याचेच फलित म्हणून समान काम समान वेतनचा निर्णय आता अंतिम टप्प्यात आला आहे..
माझी सर्व कामगार बांधवांना कळवण्यात येत आहे,
              आयुक्तांनी सांगितले की समान काम समान वेतन अहवाल तयार करण्यात आला आहे.विषय अंतिम चर्चेसाठी समितीनं समोर ठेवण्यात आला आहे.यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
               मा.आमदार शशिकांत शिंदे साहेबानी समान काम समान वेतन ची सुरुवात ही चांगली केली आहे आणि त्याच्या कडून या विषयाचा शेवट ही चांगला होणार आहे.
त्यामुळे कामगारांना विनंती आहे की कोणत्याही भूलथापांना बळी पडून समान काम समान वेतन विषय भलतीकडे नेऊ नये.यामुळे कामगारांच्या भविष्याचे खूप मोठे नुकसान होईल.
सय्यम बाळगा ! विजय आपलाच आहे  .

– नितीन नाना चव्हाण
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन

संजय सुतार
कामगार प्रतिनिधी
8082347721
राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *