Headlines

Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!

Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!
Sandeep Deshpande on Ashish Shelar: 'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल!



Sandeep Deshpande on Ashish Shelar: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदा वात पेटवल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोगस मतदारांचा (bogus voters Mumbai) मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. महाविकास आघाडीसह विराट मोर्चा मुंबईमध्ये काढल्यानंतर मुंबई भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी मतदारांच्या जातीवरून तसे धर्मावरून प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघांमध्ये (Bandra West constituency) बोगस मतदार असल्याची पोलखोल करत शेलारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार यांच्या राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर बोगस मतदार असल्याचे त्यांनी दाखवून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असा टोला लगावला. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही बोगस मतदारांची नावे वाचून दाखवली. त्यामध्ये काही मुस्लिम मतदारांची नावे सुद्धा होती. 

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून (fake voter list Mumbai)

संदीप देशपाडे म्हणाले की, वांद्रे पश्चिम शेलारांचा मतदारसंघ आहे. जे दुसऱ्यांचे मतदारसंघ काढतात शोधून, पण त्यांच्यामध्ये कोण दुबार आहे, याची माहिती नाही. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून अशी सवय शेलारांना आहे. शेलारांच्या मतदारसंघात एक नाव सापडून आलं ते गुलाम मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार नाव आहे. मग आशिष शेलार हे सगळं होईपर्यंत झोपले होते का? एका मुसलमानाच नाव त्यांच्या तीन बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंगमध्ये होत आहे आणि आशिष शेलारांना पत्ता नाही, असा टोला लगावला. परप्रांतीयांची नाव जाणीवपूर्वक मतदारयादीत घुसवली जात आहेत. जेणेकरून परप्रांतीय महापौर करायचा आहे त्याला बळ मिळावं यासाठी हे धंदे चाललेले आहेत, असा आरोपही देशपांडे यांनी केला. 

शेलार झोपले होते का? (Sandeep Deshpande press conference)

ते म्हणाले की, शेलार झोपले होते का? की जाणीवपूर्वक नावं घुसवण्यात आलं हा संशोधनाचा विषय आहे. आमचा काय आशिष शेलारांवर कुठला आरोप नाही, पण मग आशिष शेलार जागरूक नाहीत का हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. देशपांडे यांनी मतदार यादीतील परप्रांतीय नावांवरून भाजप आणि अप्रत्यक्षपणे आशिष शेलार यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की,  परप्रांतीयांची मत आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नाव घुसडवली आहेत का? भारतीय जनता पक्षाने नाव घुसवली आहेत का? इथं संशयाला जागा असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *