Headlines

Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती; संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती; संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Sanjay Raut: आरोपींच्या गाडीत हत्यारं अन् जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट, माझ्याकडे पक्की माहिती; संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या


मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या आवारातच एकमेकांसोबतच भिडले. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गावगुंडांप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. कॉलर धरत ‘म’ भ’ च्या भाषेत शिवीगाळ करीत एकमेकांना हाणलं. एकमेकांचे कपडे फाडले. यापूर्वी विधानभवनात कधीही न घडलेल्या या घटनेमुळे सर्वांची मान शरमेने खाली गेल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केला आहे, त्याचबरोबर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची वेळ आली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का?

भ्रष्टाचार, व्याभिचार, हनी ट्रॅप, आमदार निवासमध्ये असणारी टॉवेल गॅंग, मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. मोक्काचे आरोपी, खुनाचे आरोपी, दाऊदच्या हस्तर हे पक्षात घेतले जात आहेत, विधिमंडळात घेतले जात आहेत, हीच का या महाराष्ट्राची संस्कृती आहे? हे मला देवेंद्र फडणवीस यांना विचारायचा आहे. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का? ज्या संस्कारातून ते आलेले आहेत, त्या संस्कारात हे सगळं बसतं का? जे आता सध्या राज्यात सुरू आहे आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना जे मान घालून बसले होते, त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होतं, पांडव कमजोर होते, म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण उघड्या डोळ्यांनी ते पाहत होते. द्रोपदीला जुगारावर लावणाऱ्यांची संस्कृती देशात निर्माण झाली होती, मला वाटतं भारतीय जनता पार्टी पार्टी हा पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहेत. त्याला सर्वस्वी ते जबाबदार आहेत. कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले आहेत, असंही पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे

महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं, काल गॅंग वॉर झालं. विधान भवनात गॅंगवर झालं. मी सभागृहात म्हणत नाही. विधान भावनांमध्ये झालं असं म्हणतोय. परिसराला आपण भवन म्हणतो. विधान भवनामध्ये काल टोळी युद्ध झालं. खुनाचे आणि मोकोकाचे आरोपी दरोड्यातील आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये होते. त्यांना तिथे कोणी आणलं त्यांच्यावर काय कारवाई झाली. कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचा स्पष्ट मत झालं, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. त्याचं कारण म्हणजे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येईल. हे गुंडांचं राज्य झालं आहे. जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, किंवा अन्य कोणी मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या पायऱ्यांवर किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा. इथे राष्ट्रपती राजवट लावा. मग काल त्यांना असं वाटलं नाही का? त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य आता राष्ट्रपती राजवट लावण्याचा लायकीचे झाले आहे, दोन आमदारांचे समर्थक असे हल्लाबोल करत नाहीत. भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक काल होते. त्यांचा रेकॉर्ड तुम्ही तपासून पहा. त्यांचे रेकॉर्ड समोर आलेले आहेत. त्यातील किती मकोकाचे आरोपी आहेत. मकोकाचे आरोपी, दाऊद इब्राहिमचे हस्तक विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागलेले आहेत, उद्या ते विधानसभेत जातील सभागृहात येतील. आणि त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल असंही राऊत पुढे म्हणालेत. 

देवेंद्र फडणवीस हनी ट्रॅपवर काही बोलले का?

गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात भाजपच्या लोकांची भरती झालेली आहे, ही भरती पूर्वीची गुंडांची भरती होती. त्या पद्धतीची ही भरती आहे. सध्या हनी ट्रॅप प्रकरण चाललं आहे, नाशिक सह इतरत्र त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस काही बोलले का? त्यांनी बोलायला हवं. नाना पटोले, जयंत पाटील, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे, अनिल परब यांनी हा विषय विधिमंडळात मांडला त्यावर सरकारचा मत काय आहे.

कालच्या घटनेवर सरकारचे मत काय आहे, या लोकांना त्याचसाठी विधान भवनात विरोधी पक्षनेता नको आहे, या सर्व विषयांवर तो विधिमंडळात आवाज उठवेल आणि सरकारला जाब विचारेल म्हणूनच ते विरोधी पक्षनेता होऊ देत नाहीत, माझी मागणी आहे. राज्यपालांना जर ते खरोखर घटनेचे आणि संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल मंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायला हवी. गुंडटोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचले आहेत, विधानसभेच्या दाराच्या बाहेर ते गेले आहेत, काल फक्त चाकू सुरे आणि हत्यारे बाहेर काढायची राहिली होती, आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यार होती असा दावाही राऊतांनी केला आहे.  कालच्या मकोकाच्या आरोपींच्या गाडीत हत्यारे होती आणि जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट होता अशी माझी पक्की माहिती आहे, असेही राऊत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *