Headlines

Satara Crime News: पाचशे रुपयांचं अमिष दाखवलं; दोन नराधमांचा 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीनं नाव घेतली अन्…, घटनेनं सातारा हादरलं

Satara Crime News: पाचशे रुपयांचं अमिष दाखवलं; दोन नराधमांचा 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीनं नाव घेतली अन्…, घटनेनं सातारा हादरलं
Satara Crime News: पाचशे रुपयांचं अमिष दाखवलं; दोन नराधमांचा 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीनं नाव घेतली अन्…, घटनेनं सातारा हादरलं


सातारा: साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे (Satara Crime News). एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती समोर आली आहे. लालासो यशवंत पवार (वय वर्षे 55) आणि विकास जाधव उर्फ इब्य्रा वय 25 अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्ही आरोपींची नावे मुलीने सांगितल्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचे समुपदेशन केले जात आहे. या प्रकरणात रहिमतपूर पोलिसांनी मात्र या प्रकरणाबाबत प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे. या घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईत डे-केअर सेंटरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार

आणखी एका अत्याचाराच्या घटनेनं मुंबई हादरली आहे, मुंबईच्या दिंडोशी परिसरात नागरी निवारा परिषदेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या डे-केअर सेंटरमध्ये लहान मुलींवरती 44 वर्षीय पतीकडून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गोरेगावच्या नागरी निवारा परिसरामध्ये 5 ते 6 लहान मुलीवर 44 वर्षीय आरोपीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. एका डेकेअर सेंटरमध्ये 44 वर्षीय व्यक्तीकडून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली, सात वर्षीय मुलीने याबाबत आपल्या पालकांना माहिती देताच पालकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली.

आरोपीची पत्नी घरात ट्युशन चालवायची, त्याचसोबत पाळणाघर देखील चालवत होती, मोठ्या संख्यामध्ये लहान मुलं या आरोपीचे घरी पाळणा घरात आणि ट्युशनसाठी येत होते. शेजारी राहणारी 7 वर्षाची मुलगी आरोपीच्या घरी ट्युशनसाठी आली असता आरोपीने बेडरूममध्ये घेऊन जाऊन मुलीला मोबाईलमध्ये गेम खेळण्यासाठी देऊन मुलीचा विनयभंग केला. यानंतर मुलीचा पालकांना तीन दिवसापूर्वी माहिती मिळताच त्यांनी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, दिंडोशी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

दिंडोशी पोलिसांनी आरोपीकडून तपास केल्यावर त्यांनी आतापर्यंत 5 ते 6 लहान मुलींसोबत अशाप्रकारे विनयभंग केल्याचा उघड झाली आहे. अटक आरोपीला दिंडोशी पोलिसांनी बोरिवली कोर्टात हजर केले असता बोरिवली कोर्टाने पाच दिवसाचा पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या दिंडोशी पोलीस या आरोपीने आणखी किती लहान मुलीचा विनयभंग केला आहे, यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *