Headlines

शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं

शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं
शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; माणिकराव कोकाटेंनी समर्थकांना शांत केलं


Manikrao kukate: विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आले आहेत. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आहेत.  रमी प्रकरणामुळे (Rummy Video) वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची गच्छंती होणार हे आता निश्चित मानले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी रात्री दीर्घ चर्चा झाली . यात मंगळवारपर्यंत कोकाटेंबाबत निर्णय घेतला जाईल स्पष्ट करण्यात आले .दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही अजित पवारांवर माझा विश्वास आहे असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांना शांत केलं . कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचना दिल्यानंतर समर्थकांनी हे माघार घेतली आहे .

माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही :कृषिमंत्री कोकाटे

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ काहींनी मेळवा बोलवला होता . कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही . .अजित पवारांवर माझा विश्वास आहे असे म्हणत समर्थकांना शांत केले .कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सूचना दिल्यानंतर समर्थकांनी माघार घेत बोलावलेला मेळावा रद्द केला .कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही शिवाय राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे खाते म्हणून माझ्या विभागाचे काम आहे.शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही अजित पवारांवर माझा विश्वास आहे. असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी समर्थकांची समजूत काढली .त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ होणारी आंदोलन रद्द करण्यात आली आहेत

माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अटळ ?

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे .उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात शुक्रवारी पुण्यात रात्री दोन तास चर्चा झाली . सभागृहातील माणिकराव कोकाटे यांचे कृत्य त्यानंतर पत्रकार परिषदेत सरकारला भिकारी म्हणाले .या वक्तव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती आहे .वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारला सातत्याने अडचणीत आणत असल्याने आता राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची चर्चा या बैठकीत झाली .आज संध्याकाळपर्यंत कोकाटे यांचा बाबतचा निर्णय अजित पवार पक्षातील आपल्या नेत्यांजवळ जाहीर केला जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘एबीपी माझा ‘ला दिली आहे .

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *