
शेअर बाजाराला आनंदाचे भरतेImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
US-India trade deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली आणि प्रलंबित व्यापारी करारावर शिक्कामोर्तब झाले. ही वार्ता येताच भारतीय शेअर बाजाराला आनंदाचे भरते आले. टॅरिफमध्ये कपात होताच शेअर बाजार बहरला. मंगळवारी शेअर बाजार तेजीसह उघडला. बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये जबरदस्त रॅली दिसून आली. शेअर बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 4200 अंकांचे मोठे तुफान आले. त्यामुळे बीएसई मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी आली. सोमवारी जेव्हा बाजार बंद झाला. तेव्हा मार्केट कॅप 4,55,03,877.32 कोटी रुपये होते. तर आज बाजार उघडताच तो उसळून 4,78,12,017.96 कोटी रुपये झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एका झटक्यात 23 लाख कोटींची कमाई केली. बाजारात तेजीचे सत्र कायम आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स जवळपास 3 टक्के तेजीसह 83,974.65 वर ट्रेड करत होता. तर निफ्टी 50 जवळपास 25,812.65 वर व्यापार करत होता.
शेअर बाजारात झुम बराबर झूम
सकाळच्या सत्रात शेअर बाजारात तुफान तेजी दिसून आली. निफ्टीचे सर्व मुख्य क्षेत्रातील निर्देशांक हिरव्या रंगात न्हाऊन निघाले आहे. बांधकाम क्षेत्रातील सर्व शेअर तेजीतत आहे. निफ्टी रियल्टी इंडेक्स 4 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. याशिवाय ऑटो, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राहकाभिमूख वस्तू,आयटी आणि मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. बँकिंग शेअर्स पण तेजीत आहेत. निफ्टी खासगी बँकांचा शेअर जवळपास 3 टक्के आणि निफ्टी बँक 2.5 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. नवीन व्यापार कराराचा हा परिणाम असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
निफ्टीच्या टॉप गेनर्सच्या यादीत वित्त क्षेत्रातील आणि अदानी समूहाच्या शेअर्सचा दबदबा दिसून आला. अदानी एंटरप्राईजेसस जवळपास 9 टक्के आणि अदानी पोर्टस 7 टक्क्यांहून अधिकने वधारला. बजाज फायनान्स, जिओ फायनेन्शियल सर्व्हिसेज आणि श्रीराम फायनान्स सारख्या शेअरमध्ये उसळी दिसली. तर आयटीमधील इन्फोसिस आणि फार्मा सेक्टरमध्ये डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज सध्या तेजीत आहेत.
या शेअरमध्ये तुफान
ताज्या घडामोडीनंतर सेन्सेक्स 2400 तर निफ्टीने 700 अंकांची झेप घेतली. टॅरिफ डीलमुळे शेअर बाजार बहरला. शेअर बाजारात Adani Ports, Reliance मोठी झेप घेतली. तर बजाज फायनान्स (6.50%), इंटरनॅशनल शेअर(4.50%), बजाज फिनसर्व्ह (4.31%), इंडिगो (3.99%), महिंद्रा अँड महिंद्रा शेअर (3.95%), सनफार्मा (3.63%), इन्फोसिस (3.50%), टायटन (3%) आणि मारुती (2.94%) हे दहा शेअर बाजारात आघाडीवर आहेत. हे शेअर टॉप 10 गेनर्स म्हणून पुढे आले आहेत. ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना तुफान फायदा झाला आहे.