Headlines

शॉकिंग ! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या तरुणानं नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल ; हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत जीव संपवला

शॉकिंग ! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या तरुणानं नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल ; हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत जीव संपवला
शॉकिंग ! IIT बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या तरुणानं नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल ; हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत जीव संपवला


Mumbai crime: आयआयटी बॉम्बेच्या परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट ) मध्यरात्री घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.(Pawai IIT Bombay engineer Sucide)

नेमकं घडलं काय?

पवईत आयआयटी बॉम्बे मध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणानं नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं आहे . हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी मारत त्यानं आयुष्य संपवलं आहे .मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. शिक्षणाच्या तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. रात्री उशिरा हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. विद्यार्थ्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. आत्महत्येचं कारण स्पष्ट होण्यासाठी त्याचा मोबाईल, रूममधील नोट्स व इतर वस्तूंची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमध्ये वाढत्या शैक्षणिक तणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने घडत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या आधीही आयआयटीमध्ये अशा प्रकारच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.पोलिसांकडून अधिकृत माहिती येणे बाकी असून, शिक्षणसंस्थेने या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दिल्लीत CA तरुणाची आत्महत्या

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गोल मार्केट परिसरातील एका हॉटेलमध्ये एका चार्टर्ड अकांऊंटट (Delhi CA Suicide) असलेल्या तरुणाने आत्महत्या (Suicide news) केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या तरुणाचे नाव धीरज कंसल असे असून तो फक्त 25 वर्षांचा होता. धीरज कंसल याने अत्यंत भयानक पद्धतीने स्वत:चे आयुष्य संपवले. पोलिसांना त्याचा मृतदेह अत्यंत विचित्र अवस्थेत सापडला. धीरज कंसल याने एक सुसाईड नोट लिहली होती. यामध्ये त्याने म्हटले आहे की,कृपा करुन माझ्या मृत्यूनंतर दु:खी होऊ नका. मृत्यू ही माझ्या जीवनाचा सर्वोत्तम भाग होता. आत्महत्या करणं वाईट नाही, कारण माझ्यावर कोणाचाही जबाबदारी नव्हती किंवा माझं कोणाशी घट्ट नातं नव्हतं. माझ्यामुळे कोणीही नैराश्यात जाणार नाही, असे धीरज कंसल याने या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

 

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *