Headlines

दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांची डिमांड, मुंबईत धक्कादायक घटना

दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांची डिमांड,  मुंबईत धक्कादायक घटना
दुकानात घुसून तरुणानं घागरा फाडला, सोशल मीडियावर बदनामीची धमकी अन् 3 लाखांची डिमांड,  मुंबईत धक्कादायक घटना


Mumbai Crime: कल्याण, पश्चिम शहरातील प्रसिद्ध ‘कलाक्षेत्र’ या दुकानात घागऱ्याच्या व्यवहारावरून सुरू झालेला सौम्य वाद काही तासांतच धक्कादायक वळणावर पोहोचला. लग्नासाठी खरेदी केलेल्या तीस हजार रुपये किमतीच्या घागऱ्यावरून एक वाद उफाळून आला, धारदार चाकूने तरुणाने दुकानात येऊन घागरा फाडला आणि दुकानदाराकडे तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे.कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

नेमकं घडलं काय?

लग्नासाठी खरेदी केलेला घागरा पसंत पडला नाही, तरुणी घागरा घेऊन दुकानात वापस करायला गेली तर दुकानदारानं स्पष्ट नकार दिला. तेवढ्यात तरुणीचा पती दुकानात पोहोचला. दुकानदारासोबत वाद घालण्यास सुरुवात करत खिशातून धारदार चाकू बाहेर काढला. दुकानातच घागरा फाडून टाकला अन् दुकानदाराकडे थेट 3 लाखांची मागणी करत दुकानाची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. मुंबईतील कल्याणमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाबरलेल्या दुकानदारानं थेट पोलीस ठाणं गाठलं. पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास करत आहे.

कल्याण पश्चिममधील ‘कलाक्षेत्र’ या दुकानातून मेघना माखिजा या तरुणीने लग्नासाठी तीन हजार रुपयांचा घागरा खरेदी केला. परंतु घरी गेल्यावर तो घागरा तिला पसंत पडला नाही. यानंतर ती परत दुकानात आली आणि घागरा दुकानदाराला परत केला. त्या वेळी दुकानदाराने स्पष्ट सांगितले की, “तीन महिन्यांच्या आत तुम्ही आमच्या दुकानातून त्या रकमेइतक्या वस्तू खरेदी करू शकता,” अशी चर्चा दोघांमध्ये शांतपणे पार पडली. मात्र काही वेळानंतर, तरुणीचा होणारा पती – सुमित सयानी – दोन तासांनी दुकानात पोहोचला. त्याने घागऱ्याबाबत दुकानदारासोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि खिशातून धारदार चाकू काढून घागरा फाडून टाकला. त्यानंतर सुमितने दुकानदाराकडे थेट ३ लाख रुपयांची मागणी केली आणि धमकी दिली की, “जर पैसे दिले नाहीत, तर तुझ्या दुकानाची बदनामी सोशल मीडियावर करीन,” असं सांगून तिथून निघून गेला.घटनेनंतर घाबरलेल्या दुकानदाराने तात्काळ कल्याण पश्चिम बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे बाजारपेठ पोलीस घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनंतर बाजारपेठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरातून किरकोळ कारणांवरून होणाऱ्या गुन्हेगारी घटना वारंवार समोर येत असताना ही घटना समोर आली आहे.

हेही वाचा

Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *