Headlines

Social Media: समाज माध्यमांना कटेंटच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठणकावले, ऑनलाईन सुरक्षिततेवर केले मोठे भाष्य

Social Media: समाज माध्यमांना कटेंटच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठणकावले, ऑनलाईन सुरक्षिततेवर केले मोठे भाष्य
Social Media: समाज माध्यमांना कटेंटच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही, मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ठणकावले, ऑनलाईन सुरक्षिततेवर केले मोठे भाष्य


अश्विनी वैष्णव, सोशल मीडियाImage Credit source: गुगल

Minister Ashwini Vaishnav on Social Media Platform: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सध्या सर्वात सशक्त माध्यम मानले जाते. अनेक जण या समाज माध्यमावर व्यक्त होतात. पण सध्या सोशल मीडियातील कंटेंटवरून वाद उद्भवतात अथवा त्यावरील कंटेंटवर आक्षेप नोंदवण्यात येतो. याविषयीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समज दिली आहे. समाज माध्यमांना कंटेंटच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही. त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही असे त्यांनी बजावले. मुलांची आणि नागरिकांची ऑनलाईन सुरक्षितता ही या प्लॅटफॉर्मची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. DNPA Conclave 2026 मध्ये ते बोलत होते.

महसूलाचा योग्य वाटप करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी कंटेंट तयार करणाऱ्या लोकांबरोबर योग्य पद्धतीने महसूलाचे वाटप करणे आवश्यक असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. बातमीदार असोत, पारंपारिक मीडिया क्षेत्रातील लोक असोत, देशातील कानाकोपऱ्यातून कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स, प्राध्यापक आणि संशोधक असोत, ही सर्व मंडळी या प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांचे काम प्रसारित करत आहेत. त्यांना त्यांचा योग्य मेहनताना मिळावा असे मंत्री वैष्णव यांनी म्हटले.

कटेंटच्या जबाबदारीतून पळ काढता येणार नाही

सोशल मीडियाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील कंटेंटची जबाबदारी टाळता येणार नाही. ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी. मुलांची ऑनलाईन सुरक्षितता, सर्व नागरिकांची ऑनलाईन सुरक्षितता ही या प्लॅटफॉर्मची जबाबदारी आहे. या तत्त्वांचे पालन न केल्यास त्यांना नक्कीच जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही वैष्णव यांनी दिला. आता इंटरनेटचे स्वरूप बदलले आहेत. संबधित व्यक्तीच्या संमतीशिवाय तिचा चेहरा, आवाज अथवा व्यक्तिमत्वाचा वापर करत कृत्रिम कंटेंट तयार करू नये असा सल्ला त्यांनी दिला. या प्लॅटफॉर्मनी लोकभावनेचा आदर करायला हवा. त्यांनी मूलभूत गरज लक्षात घेत या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी याविषयी त्यांनी स्पष्ट केले. माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, DNPA Conclave 2026 मध्ये संबोधित करताना त्यांनी प्लॅटफॉर्मला ताकीद दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *