Headlines

Solapur | अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई, 36 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

Solapur | अन्न व औषध  प्रशासनाची धडक कारवाई, 36 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त
Solapur | अन्न व औषध  प्रशासनाची धडक कारवाई, 36 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त


अन्न आणि औषध प्रशासन विभाग सध्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खासगी सचिवालाही अलीकडेच कार्यमुक्त करण्यात आले आहे. ही प्रकरणं ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक गंभीर घटना घडली आहे. माढा तालुक्यातील बावी गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकारी रेणुका पाटील यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अवैध गुटखा साठ्याविरोधात कारवाई करण्यासाठी त्या पथकासह दाखल झाल्या असताना ही घटना घडली. दरम्यान, माढा पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करत गुटख्याने भरलेली पिकअप गाडी जप्त केली आहे. संबंधित वाहनातून विविध प्रकारचा सुगंधित गुटखा आढळून आला. प्रशासनाने सुमारे 30 पोती गुटखा ताब्यात घेतला असून एकूण 36 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *