
China Worship Toilets: जगातील प्रत्येक देशात, भागात एक खास परंपरा असते. काही परंपरा अनाकलनीय असतात. त्या अशा विचित्र वाटतात की डोकं काम करत नाही. प्रत्येक घरात टॉयलेट असते. पण ते अगदी कोपऱ्यात अथवा कायम बंद ठेवण्याचा प्रघात असतो. कारण त्यातून आजार आणि रोग पसरण्याची भीती असते. त्यासाठी सातत्याने टॉयलेट स्वच्छ ठेवावं लागते. टॉयलेटकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो. पण या देशात टॉयलेटची पूजा केली जाते असे म्हटले तर तुम्हाला ते पटेल का? तर चीनमधील ग्रामीण भागात आजही टॉयलेटची पूजा केली जाते. येथील लोक टॉयलेट समोर झुकतात. टॉयलेटसमोर नतमस्तक होतात. त्याची पूजा करतात. पण या देशात अशी अनोखी प्रथा का पाळली जाते?
टॉयलेटची पूजा का केली जाते?
चीनच्या दुर्गम भागात थेट लॅटर्न महोत्सव (Lantern Festival) साजरा केल्या जातो. चीनमधील लूनर कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यात 15 व्या दिवशी हा लॅटर्न महोत्सव साजरा होतो. चीनच्या वसंत महोत्सवानंतर हा सण येतो. या दिवशी महिला हातात अगरबत्ती घेतात. त्या टॉयलेटसमोर जातात. त्या टॉयलेट समोर उभ्या राहतात. त्याची पूजा करतात. जिगू देवीची (Zigu Goddess) यावेळी पूजा केली जाते. ती टॉयलेटची देवी मानली जाते.
जिगू देवीच्या पूजेची परंपरा
ही परंपरा केवळ पूजेपूरती मर्यादित नाही. या परंपरेत भविष्य सुद्धा जाणून घेतले जाते. महिला टॉयलेट स्वच्छ करतात. स्वच्छ करतात. एक छोटा पुतळा ठेवल्या जातो. एक मूर्ती ठेवली जाते. तिच्यासमोर अगरबत्ती धरली जाते. या देवीकडे शेती, लग्न आणि आरोग्याविषयीचे प्रश्न विचारले जातात. जर या पूजेदरम्यान ही मूर्ती थोडी जरी हलली तरी हे देवीचे संकेत मानले जातात. श्रद्धा आणि स्वच्छतेचे हे अजब रसायन मानले जाते.
जिगू देवी कोण?
जिगू नावाच्या एका महिलेशी संबंधित ही कथा आहे. तिचा कित्येक वर्षांपूर्वी खून करण्यात आला होता. ती अत्यंत सुंदर, मनमोहक स्त्री होती. ती एका श्रीमंत माणसाच्या घरात काम करत होती. त्या व्यक्तीची पत्नी जिगूवर जळत होती. तिची ईर्षा करत होती. एकदिवस तिने जिगूला मारले. तिचा मृतदेह एका टॉयलेट जवळ ठेवण्यात आला. त्या घटनेपासून जिगू ही देवी टॉयलेटची देवता म्हणून पुजण्यात येऊ लागली. ही सुंदर महिला देवीचे रुप झाली. तिच्या पूजेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येत असल्याचे मानले जाऊ लागले.