Headlines

Sunetra Pawar | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन; शक्ती कायदा लवकर संमत करण्यावर भाष्य

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, 8 मार्च रोजी जगभरात साजरा झालेल्या महिला दिनानिमित्त, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. सुनेत्रा पवार यांनी भाषणात राज्यात महिलांच्या उत्थानासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकार लवकरच ‘शक्ती कायदा’ संमत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत आहे, ज्यामध्ये ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, आणि ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांचा समावेश आहे. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट, आणि महालक्ष्मी सरस यांसारख्या उपक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय, बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, जेणेकरून महिलांच्या उत्पादनांची मागणी वाढेल आणि आर्थिक सक्षमीकरणास चालना मिळेल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *