
Sunil Gavaskar on Cameron Green : IPL 2026 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा (KKR) अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याची कामगिरी थंडावली आहे. त्याची क्रिकेट विश्वात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने अतिरिक्त ताण व्यवस्थापनातंर्गत त्याला गोलंदाजी करण्यास मज्जाव केला आहे. त्याचा परिणाम कोलकत्ता नाईट रायडर्सच्या (KKR) संघावर स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे.
सर्वात महागड्या खेळाडूवर तोंडसुख
कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे, माजी गोलंदाज वसीम जाफर यांच्याविरोधात याअगोदरच सुनील गावस्कर यांची तोफ धडाडली आहे. आता त्यांनी कॅमरून ग्रीनविरोधात मोर्चा उघडला आहे. त्याच्या जागी नवीन आणि उमद्या खेळाडूला घेण्याचा सल्ला त्यांनी केकेआरला दिला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सने लिलावात कॅमरून ग्रीन याला 25.20 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण सुरुवातीच्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. मग इतका महागडा खेळाडू खरेदी करून संघाला फायदा तरी काय झाला असा सवाल गावस्कर यांनी केला आहे.
स्फोटक वक्तव्याने खळबळ
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या मते कॅमेरून ग्रीन हा पाठीच्या दुखण्यातून आता सावरत आहे. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामातील सुरुवातीच्या 10 ते 12 दिवस त्याने गोलंदाजी करणे योग्य होणार नाही. हाच धागा पकडून सुनील गावस्कर यांनी केकेआर संघ व्यवस्थापनाला सल्ला दिला आहे. जोपर्यंत कॅमेरून या दुखण्यातून सावरत नाही, तोपर्यंत त्याच्याऐवजी उमद्या खेळाडूला संधी द्यावी आणि संघाची ढासळती बाजू सावरावी असे गावस्कर यांनी सुचवले आहे. कॅमेरून ग्रीन हा चांगला फलंदाज आहे. पण अजून त्याला सूर गवसला नाही.
दोन सामन्यात अवघ्या 20 धावा
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानुसार, कॅमेरून ग्रीन पाठीच्या दुखण्यातून लवकरच बाहेर येईल. पण तोपर्यंत तो तीन ते चार सामन्यात तो गोलंदाजी करू शकत नाही. अर्थात ग्रीन हा नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे तो लवकरच मैदानात अष्टपैलू कामगिरी दाखवले असे केकेआरला वाटते. सध्याचे त्याला कामगिरीची छाप सोडता आलेली नाही. त्याने मुंबईविरोधात केवळ 18 धावा आणि सनराइजर्स हैदराबादविरोधात 2 धावा केल्या आहेत.