Sunil Tatkare | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; सुनील तटकरे यांचे मोठे विधान

Sunil Tatkare | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; सुनील तटकरे यांचे मोठे विधान
Sunil Tatkare | उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; सुनील तटकरे यांचे मोठे विधान


उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज पहिल्यांदाच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या.

अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राज्य आणि पक्षाच्या हितासाठी त्यांनी दाखवलेल्या धैर्याचे कौतुक यावेळी करण्यात आले. स्वतःच्या दुःखासोबत जनतेच्या भावना समजून घेत त्यांनी जबाबदारी स्वीकारली, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारची पूर्ण ताकद सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी राहील. राज्याच्या भविष्यातील विकासदृष्टी लक्षात घेऊन पक्ष एकजुटीने काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीमुळे राज्य आणि केंद्रातील समन्वय अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *