Headlines

Supriya Sule | राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला

Supriya Sule | राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
Supriya Sule | राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला


महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे आभार मानले.
यावेळी पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार असल्याबाबतही सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पवार साहेबांनी मला एकदा सांगितलं होतं की संसदेत गेल्यावर कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यास करूनच बोलायचं. कारण संसदेत अनेक अनुभवी आणि जाणकार लोक असतात आणि संपूर्ण देश आपल्याकडे पाहत असतो. त्यामुळे हे खूप जबाबदारीचं काम आहे. पुढे बोलताना त्यांनी एक आठवणही सांगितली. त्या म्हणाल्या की, मी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून संसदेत गेले तेव्हा पवार साहेब माझ्यासोबत होते. संसदेत जाताना त्यांनी मला सांगितलं होतं की, तुला इथे येण्याची संधी बारामती मतदारसंघामुळे मिळाली आहे, त्यामुळे त्या लोकांची नेहमी जाणीव ठेव आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहा. हाच सल्ला मी पार्थ पवार यांनाही देईन, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *