T20 WC 2026 : दक्षिण अफ्रिकेकडून दारूण पराभव झाल्यानंतरही टीम इंडिया जेतेपद मिळवणार? कसं काय?

T20 WC 2026 : दक्षिण अफ्रिकेकडून दारूण पराभव झाल्यानंतरही टीम इंडिया जेतेपद मिळवणार? कसं काय?
T20 WC 2026 : दक्षिण अफ्रिकेकडून दारूण पराभव झाल्यानंतरही टीम इंडिया जेतेपद मिळवणार? कसं काय?


दक्षिण अफ्रिकेकडून दारूण पराभव झाल्यानंतरही टीम इंडिया जेतेपद मिळवणार? कसं काय?Image Credit source: BCCI Twitter

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची विजयाची रेलगाडी रूळावरून घसरली आहे. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपासून विजयाची मालिका यंदा खंडीत झाली आहे. सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने भारताचा दारूण पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 111 धावा करू शकला आणि 76 धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे आता उपांत्य फेरीचं गणित सुटेल की नाही अशी भीती क्रीडाप्रेमींना सतावत आहे. गेल्या दोन वर्षांची मेहनत वाया जाऊ नये यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत. असं असताना टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत जेतेपद मिळवू शकतो अशी स्थिती आहे. तुम्ही असं कसं शक्य आहे? तर या स्पर्धेच्या इतिहासातील एक समीकरण जुळून आलं आहे. 19 वर्षांपूर्वी असंच काहीसं घडलं होतं. 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असंच झालं होतं. टीम इंडियाला दुसर्‍या फेरीतील पहिला सामना गमवावा लागला होता. चला जाणून घेऊयात

2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत काय झालं होतं?

2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं होतं. इतकंच काय तर नेट रनरेटही सुधारला होता आणि उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर भारताने उपांत्य फेरीही जिंकली आणि अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं.

2026 टी20 वर्ल्डक स्पर्धेत तशीच स्थिती

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 19 वर्षानंतर अशीच स्थिती जुळून आली आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट बिघडला आहे. आता भारताचे पुढचे दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी होणार आहेत. हे दोन्ही सामने टीम इंडियाला जिंकणं भाग आहे. तसेच नेट रनरेट सुधारावा लागणार आहे. तरच टी20 वर्ल्डकप 2007 सारखं घडेल. आता हे समीकरण निव्वळ योगायोग आहे. पण तसं जुळून येणंही महत्त्वाचं आहे. आता 19 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती घडते की नाही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *