T20 World Cup 2026 : पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरीची संधी, कसं काय ते समजून घ्या

T20 World Cup 2026 : पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरीची संधी, कसं काय ते समजून घ्या
T20 World Cup 2026 : पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरीची संधी, कसं काय ते समजून घ्या


T20 World Cup 2026 : पाकिस्तानला अजूनही उपांत्य फेरीची संधी, कसं काय ते समजून घ्याImage Credit source: Icc X account

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील गट 2 मधील सुपर 8 फेरीचा तिसरा सामना पार पडला. हा सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झाला. उपांत्य फेरीतील आशा कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय महत्त्वाचा होता. पण तसं झालं नाही. इंग्लंडने पाकिस्तानला 2 गडी राखून पराभूत केलं. यासह या गटातून उपांत्य फेरीत स्थान मिळवणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या असं अनेकांना वाटलं. पण अजूनही पाकिस्तानची उपांत्य फेरीची संधी गेलेली नाही. अजूनही दुसऱ्या स्थानासाठी तीन संघात चुरस असणार आहे. त्यासाठी एका चमत्काराची गरज आहे. जर तसं घडून आलं तर पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकते. न्यूझीलंडच्या पदरात 1 गुण पडला आहे आणि नेट रनरेट हा 0 असल्याने दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा 1 गुण असून नेट रनरेट हा -0.461 आहे. त्यामुळे तिसर्‍या स्थानावर आहे. तर श्रीलंकेने पहिला सामना गमवला असून पदरात काहीच नाही. पण नेट रनरेट हा -2.550 आहे. उपांत्य फेरीचं गणित कसं काय ते समजून घ्या

पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर..

पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना पाकिस्तानला काहीही करून जिंकावाच लागणार आहे. कारण हा सामना जिंकला तर पदरात 3 गुणांची कमाई होईल. तसेच न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं. न्यूझीलंडच्या एका विजयाची आणि एका पराभवाची किंवा न्यूझीलंड दोन्ही सामन्यात पराभूत व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. न्यूझीलंडचा संघ दोन्ही सामन्यात पराभूत झाला तर पाकिस्तानचं नेट रनरेटचं गणित राहणार नाही.

न्यूझीलंडचा दोन्ही सामन्यात पराभव झाला तर शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला नेट रनरेटचं गणित नसेल. श्रीलंकेला पराभूत केलं की थेट उपांत्य फेरीत जागा मिळेल. त्यामुळे पाकिस्तान उपांत्य फेरी गाठू शकते.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना 25 फेब्रुवारी होणार आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर गणित जर तर वर येईल. पण हा सामना कट टू कट जिंकायला हवा. जेणेकरून न्यूझीलंडला नेट रनरेट आटोक्यात राहील. या सामन्यात श्रीलंकेचा पराभव होताच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान राहील.

न्यूझीलंडचा शेवटचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 27 फेब्रुवारीला होणार आहे. सामना काहीही करून इंग्लंडने मोठ्या फरकाने जिंकला पाहीजे. जेणेकरून न्यूझीलंडचा नेट रनरेट हा मायनस होईल. असं झालं तर शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला संधी मिळेल.

पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना 28 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकला तर नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरी गाठेल. कारण न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे समान 3 गुण असतील. पण नेट रनरेटच्या आधारावर उपांत्य फेरीत स्थान मिळवेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *