
सॅम करनचा भाऊ झिम्बाब्वेकडून खेळणार, आयसीसीकडून मिळाला हिरवा कंदील Image Credit source: Getty Images
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन भावांच्या जोड्या मैदानात खेळत असल्याचं पाहिलं आहे. आताही काही जोड्या खेळत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 5 भावांच्या जोड्या मैदानात उतरल्या आहेत. यात इटलीचा जस्टीन आणि अँथोनी मोस्का, मॅनेंटी आणि हॅरी मॅनेंटी दोन भावंडांच्या जोड्या खेळत आहेत. आयर्लंडकडून हॅरी आणि टिम ट्रॅक्टर, रॉस आणि मार्क अडायर जोडी मैदानात आहे. तर नेपाळकडून आसिफ आणि आरिफ शेख ही जोडी मैदानात उतरली आहे. असं असताना या सर्व जोड्या एकाच देशाकडून खेळत आहे. पण करन भावंड वेगवेगळ्या संघातून एकाच स्पर्धेत खेळणार आहे. खरं तर हा दुर्मिळ योग आहे. सॅम करनचा भावाला झिम्बाब्वेकडून खेळण्याची परवानगी मिळाली आहे. बेन करनला आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने मंजुरी दिली आहे. आता लवकरच तो झिम्बाब्वेकडून मैदानात उतरणार आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज ब्रँडन टेलरला दुखापत झाल्याने उर्वरित स्पर्धेला मुकला आहे. त्याची जागा आता बेन करनने घेतली आहे. बेन करन हा टॉप ऑर्डर फलंदाज आहे. पण आतापर्यंत झिम्बाब्वेकडून टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण कसोटी आणि वनडे संघाचा भाग आहे. त्याने 8 कसोटी साम्यात 495 धावा आणि वनडेतील 8 सामन्यात 340 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेच्या देशांतर्गत टी20 स्पर्धेत बेन करनची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने 8 सामन्यात 130.62 च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसर्या क्रमांकाचा फलंदाज होता. त्यामुळे रिप्लेसमेंट म्हणून बेन करनचा विचार केला गेला.
सॅम आणि बेन यांचा आणखी एक भाऊ आहे. त्याचं नाव टॉम करन असून तो देखील इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. या तिन्ही भावंडाचे वडील केविन करनही क्रिकेट खेळले आहेत. त्याने झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. या तिन्ही भावंडांचं लहानपण झिम्बाब्वेत गेलं आहे. केविन करन देखील झिम्बाब्वेकडून 1983 च्या विश्वचषकात खेळले होते.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उलटफेर केला आहे. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया 23 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे झिम्बाब्वेच्या सुपर 8 फेरीच्या आशा वाढल्या आहेत.