T20 World Cup 2026 स्पर्धेतील सहभागी 20 संघांना किती रक्कम मिळाली? जाणून घ्या

T20 World Cup 2026 स्पर्धेतील सहभागी 20 संघांना किती रक्कम मिळाली? जाणून घ्या
T20 World Cup 2026 स्पर्धेतील सहभागी 20 संघांना किती रक्कम मिळाली? जाणून घ्या


T20 World Cup 2026 स्पर्धेतील सहभागी 20 संघांना किती रक्कम मिळाली? जाणून घ्याImage Credit source: Icc X account

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर भारताला 21.5 कोटींचं बक्षीस मिळालं. यासह या स्पर्धेतील 9 पैकी 8 सामन्यात भारताने विजय मिळवला. प्रत्येक विजयासाठी भारताला जवळपास 28.64 लाख मिळाले. म्हणजेच 8 विजयांसाठी 2 कोटी 29 लाख आणखी मिळाले. तर न्यूझीलंड उपविजेता संघ ठरला. या संघाला 10.75 कोटी बक्षीस मिळालं. न्यूजीलंडने या स्पर्धेत एकूण 5 सामने जिंकले. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 5 विजयासाठी जवळपास 1.43 कोटी मिळाले. उपांत्य फेरी गाठलेल्या इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका संघाला प्रत्येकी जवळपास 6.20 कोटी मिळाले. दक्षिण अफ्रिका या स्पर्धेत 8 पैकी 7 सामन्यात विजयी झाली आणि प्रत्येक विजयासाठी 28.64 लाखांची रक्कम निश्चित होती. त्यामुळे जवळपास 2 कोटी आणखी मिळाले. तर इंग्लंडने 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे त्यांनी जवळपास 1.71 कोटी विजयासाठी मिळवले.

सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे हे संघ 5 ते 8 या स्थानादरम्यान राहिले. या संघाना प्रत्येकी 2.48 कोटींचं बक्षीस मिळालं. तर प्रत्येक सामन्यांच्या विजयाच्या दृष्टीने वेस्ट इंडिजला चार विजयासाठी जवळपास 1.43 कोटी, झिम्बावेला तीन विजयासाठी 85 लाख, पाकिस्तानला चार विजयासाठी 1.43 कोटी आणि श्रीलंकेला तीन विजयासाठी 85 लाख मिळाले.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड आणि अफगाणिस्तान यांचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. पण 9 ते 12 व्या स्थानादरम्यान राहिले. त्यामुळे या संघांना प्रत्येकी 1.24 कोटी रूपये मिळाले. तर प्रत्येक सामन्याच्या विजयाच्या दृष्टीने अमेरिकेला दोन विजयासाठी 57.28 लाख, ऑस्ट्रेलियाला दोन विजयासाठी 57.28 लाख, स्कॉटलँडला एका विजयासाठी 28.64 लाख आणि अफगाणिस्तानला दोन विजयासाठी 57.28 लाख मिळाले.

युएई, कॅनडा, इटली, नेपाळ, आयर्लंड, ओमान, नेदरलँड आणि नामिबिया या संघांचं साखळी फेरीतचं आव्हान संपुष्टात आलं. या संघांना स्पर्धेत भाग घेतला म्हणून जवळपास 1.03 कोटींची रक्कम निश्चित होतं. पण प्रत्येक विजयासाठी अतिरिक्त रक्कम मिळाली. नेदरलँड,इटली, नेपाळ, युएई आणि आयर्लंडला एका विजयासाठी 28.64 लाख मिळाले. तर कॅनडा, नामिबिया आणि ओमान या स्पर्धेत एकही सामना जिंकले नाहीत. त्यामुळे त्याची विजयी सामन्यांच्या रक्कमेची झोळी रिती राहिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *