T20i World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर झिंबाब्वेचा भारताला इशारा! कोच म्हणाला…

T20i World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर झिंबाब्वेचा भारताला इशारा! कोच  म्हणाला…
T20i World Cup 2026 : ऑस्ट्रेलिया-श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर झिंबाब्वेचा भारताला इशारा! कोच  म्हणाला…


भारत आणि श्रीलंकेत सध्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे. साखळी फेरीतून 20 पैकी 8 संघांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला. तर 12 संघांचं पॅकअप झालं. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या तगड्या संघांचं आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टातं आलं. तर झिंबाब्वे सारख्या संघाने सुपर 8 मध्ये धडक देत भल्या भल्यांना झटका दिलाय. झिंबाब्वे सुपर 8 फेरीत अजिंक्य राहिली. झिंबाब्वेने साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या वर्ल्ड कप विजेत्या संघांना पराभवाचा झटका दिला आणि सुपर 8 फेरीचं तिकीट मिळवलं. झिंबाब्वेचा या विजयामुळे विश्वास दुणावलेला आहे.

झिंबाब्वेसमोर कुणाचं आव्हान?

झिंबाब्वेसमोर आता सुपर 8 फेरीत गतविजेता आणि यजमान टीम इंडिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. सुपर 8 फेरीतील सामन्याआधी झिंबाब्वेचा सहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहीम याने प्रतिक्रिया दिली आहे. झिंबाब्वेच्या कोचने नक्की काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

डॉयन इब्राहीम काय म्हणाला?

पीटीआयनुसार, “टीम इंडिया विरूद्धच्या सुपर 8 मधील सामन्याआधी आम्हाला (झिंबाब्वेला) अंडरडॉग म्हटलं जात आहे. मात्र आम्ही त्यानंतरही नॉर्मल आहोत. आम्हाला अंडरडॉग म्हटलं असलं तरी आम्ही सर्व गोष्टी योग्य केल्या आहेत”, असं डॉयन इब्राहीम याने म्हटलं.

“आयसीसी रँकिंग आणि इतर निकषांच्या आधारावर आमच्याकडे (झिंबाब्वे) या वर्ल्ड कप स्पर्धेत अंडरडॉग म्हणून पाहिलं जाईल, जे एकदम योग्य आहे. आम्ही खेळायला आलो तेव्हा आम्ही निश्चितपणे अंडरडॉग होतो. तसेच आम्हाला अशाच पद्धतीने खेळायला आवडतं”, अशी प्रतिक्रिया कोच इब्राहीम याने झिंबाब्वेला अंडरडॉग म्हणण्यावरुन दिली. झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा यानेही टीमला अंडरडॉग म्हणण्यावरुन प्रतिक्रिया दिली होती.

झिंबाब्वेसमोर आव्हानं काय?

इब्राहीमने सुपर 8 फेरीतील सामन्याआधी झिंबाब्वेसमोर असलेल्या आव्हानांबाबत भाष्य केलं. तसेच इब्राहीमने टीम इंडिया सामन्यात वरचढ असताना त्यांच्या खेळाडूंनी स्टेडियममधील चाहत्यांच्या दबावाला बळी न पडण्याबाबतही प्रतिक्रिया दिली.

“या संधीपासून (सुपर 8 मध्ये खेळण्याबाबत) घाबरणार नाही, हे निश्चित करणं आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे. तसेच झिंबाब्वेच्या खेळाडूंसमोर टीम इंडिया शानदार कामगिरी करत असताना स्टेडियममध्ये चाहत्यांच्या गराड्याला न दचकण्याचं आव्हान असणार आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी टीमने पूर्ण सराव केला आहे”, असं इब्राहीमने म्हटलं. त्यामुळे आता झिंबाब्वेला या सरावाचा कितपत फायदा होतो हे सुपर 8 फेरीतील सामन्यांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *