नवी मुंबई महापालिकेतील 8 हजार कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व किमान वेतनच्या प्रलंबित वेतन वाढी बाबत संघटनेच्या वतीने पत्र देऊन संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली.
विषय खालीलप्रमाणे… विषय क्रमांक १) महाराष्ट्र सरकारने किमान वेतन अधिनियम १९४८ नुसार शासन क्रमांक कि.वे.ज २०१४/५१०/प्र.क्र.१५०/कामगार-७, दिनांक 24 फेब्रुवारी 2015 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था” (ग्रामपंचायत वगळून) या रोजगारांतर्गत कामगारांना किमान वेतन दर अधिसूचनेअन्यये पुनःनिर्धारित केले होते.हे दर 5 वर्षांनी निश्चित केले जातात. परंतु सदर वेतन वाढीला 9 वर्ष झाले तरी नवीन वाढीव आधीसूचना काढण्यात आली नाही. विषय क्रमांक २) नवी मुंबई महापालिकेच्या ८ हजार कंत्राटी कामगारांना समान काम…