केंद्र सरकारचा निर्णय: देशभर चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू…
केंद्र सरकारने देशातील कामगार क्षेत्रात मोठा आणि ऐतिहासिक बदल करत 29 जुने कामगार कायदे रद्द करून नव्याने तयार केलेले चार कामगार संहिता (Labour Codes) तात्काळ प्रभावाने लागू केले आहेत. या निर्णयामुळे देशातील सर्व कामगार, उद्योग, आस्थापना आणि नियोक्त्यांसाठी नियम आता एकसमान, स्पष्ट आणि आधुनिक पद्धतीने लागू होणार आहेत. सरकारने याला “कामगार कल्याण आणि आर्थिक विकासासाठी…