Headlines
शिवप्रेमींचा विजय! राष्ट्रवादी (SP) च्या आंदोलनाला यश – उद्या स्मारकाचे अनावरण….

शिवप्रेमींचा विजय! राष्ट्रवादी (SP) च्या आंदोलनाला यश – उद्या स्मारकाचे अनावरण….

नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला चार महिन्यांपासून घाणेरड्या कपड्याने झाकून तसेच तारांच्या कुंपणाने बंदिस्त ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) तर्फे आज नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. https://www.instagram.com/reel/DRR_XVKDJsm/?igsh=MWNiMzUwOXBmdjIzaQ== मनपाच्या निष्क्रीय भूमिकेमुळे शिवभक्तांमध्ये संताप उसळला होता….

Read More
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत वगळून) मधील हजारो कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन विषयाला अखेर गती मिळाली आहे.

दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन सादर केले. या निवेदनात किमान वेतन सल्लागार समितीची नेमणूक तातडीने करण्याची ठाम मागणी केली होती, कारण समिती नसल्यामुळे वेतनवाढीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. 🏛️ १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेत किमान वेतन सल्लागार समितीची पुनर्नियुक्ती करून शासन निर्णय काढला….

Read More

किमान वेतन वाढीच्या विषयावर कामगार मंत्री आ. आकाश फुंडकर साहेब यांची भेट…

आज दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने कामगार मंत्री मा. आकाश फुंडकर साहेब यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन वाढ करण्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामगार मंत्री यांनी सांगितले की, सल्लागार समितीच्या नेमणुकीची फाईल मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित असून, याबाबत येत्या 15 दिवसांत मुख्यमंत्री यांच्याशी…

Read More
तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..

तुर्भे जलकुंभातील मृतदेह आणि निविदा घोटाळा – प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!..

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे आणि घणसोली पाणीपुरवठा विभागातील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुर्भे जलकुंभात तब्बल 5-6 महिने सडलेला मृतदेह आढळूनही जबाबदार कंत्राटदारावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली नाही. त्याचबरोबर, पंचवार्षिक देखभाल-दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.   तुर्भे जलकुंभातील मृतदेह प्रकरण? दि. 27 एप्रिल 2021 रोजी तुर्भे…

Read More
नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट : समाजसेवेचा निस्वार्थ दीपस्तंभ.

नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट : समाजसेवेचा निस्वार्थ दीपस्तंभ.

नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अपूर्व योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजसेविका रिचा समीट. निस्वार्थ वृत्तीने, कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता, त्या आणि त्यांची टीम गरजूंसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची विविध क्षेत्रांतील व्याप्ती आणि त्यागभावना समाजासाठी एक प्रेरणा आहे. Facebook Video रिचा मॅडमच्या नेतृत्वाखाली, रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांसाठी सतत कार्य चालू असते. मुलांना गरजेचे अन्न,…

Read More
कोपरखैरणे तीन टाकी येथे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात..

कोपरखैरणे तीन टाकी येथे महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात..

नवी मुंबई : कोपरखैरणे तीन टाकी येथे शुक्रवारी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात पार पाडले. महाराष्ट्र कर्मचारी युनियनने नवी मुंबई महापालिकेत अधिकारी व सर्व कामगार यांना एकत्रित करून गेली नऊ वर्ष सातत्याने ठोक मानधन व कंत्राटी कामगारांच्या हितासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत कामगारांचे प्रश्न सातत्याने प्रशासनापुढे व अधिकाऱ्यांसमवेत…

Read More